ग्रामस्थांचा सुटकेचा निःश्वास ! 'भोसेतील दारे शिवारात बिबट्या जेरबंद'; आणखी एक पिल्लू घालतय गिरट्या, महाबळेश्वर तालुक्यात भितीचे वातावरण !

Leopard captured: ग्रामस्थांनी वनविभागाच्या तात्काळ कारवाईचे स्वागत केले आहे. तरीही परिसरात खबरदारीने वावरावे, रात्रीची हालचाल टाळावी आणि शेतात एकटे न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बिबट्याच्या वावरामुळे गेल्या काही दिवसांपासून थरारलेल्या गावात आता थोडीशी दिलासा देणारी स्थिती निर्माण झाली आहे.
Fear in Mahabaleshwar Taluka: Leopard Caught, But Another Cub Still Active

Fear in Mahabaleshwar Taluka: Leopard Caught, But Another Cub Still Active

Sakal

Updated on

भोसे : भोसे (ता. महाबळेश्वर) येथील दारे शिवाराजवळ वन विभागाच्या वतीने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता. आज गुरुवारी सकाळी बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com