
महाबळेश्वर : महाबळेश्वरजवळ बंद असलेल्या हॉटेलच्या सुरक्षा रक्षकाने भंगार व्यावसायिकांच्या मदतीने हॉटेलमधील सुमारे दहा लाख रुपयांच्या मालाची चोरी केली. चोरीतून मिळालेली रक्कम घेऊन अबुधाबी येथे पळून निघालेल्या कांचन बॅनर्जी (रा. मुंबई) या सुरक्षा रक्षकाला महाबळेश्वर व सातारा गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस अधिकाऱ्यांनी मुंबई येथून विमानातून ताब्यात घेतले. याप्रकरणी सैदापूर (ता. सातारा) येथून करण घाडगे व गौतम घाडगे यांनाही अटक केली आहे.