
सातारा: शिवराज तावडेने नोंदविलेल्या गोलमुळे कोल्हापूरच्या महाराष्ट्र हायस्कूलने पन्हाळा येथील संजीवन विद्यालयावर १-० असा विजय मिळवीत कोल्हापूर विभागीय सुब्रतो मुखर्जी करंडक फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. सातारा जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने येथील श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात या स्पर्धेतील १५ वर्षांखालील गटाचे सामने नुकतेच झाले.