कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादाचे कऱ्हाडात पडसाद; मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांना अटक I Karad Police | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra-Karnataka Border Dispute

बेळगावात महाराष्ट्रातील वाहनावर दगडफेक झाल्याचे कऱ्हाडातही पडसाद उमटले आहेत.

Belgaum Border Dispute: कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादाचे कऱ्हाडात पडसाद; मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांना अटक

कऱ्हाड (सातारा) : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावर (Maharashtra-Karnataka Border Dispute) सुरू झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा महासंघ आक्रमक झाला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या महासंघाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. जमावबंदी असताना झालेल्या आंदोलनाला पोलिसांनी अटकाव केल्यानं काही काळ तणाव झाला.

हेही वाचा: Arvind Kejriwal : गुजरातमध्ये फक्त 2 जागा जिंकल्यातरी AAP रचणार मोठा इतिहास; जाणून घ्या नेमकं 'कारण'

वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी दत्त चौकात आंदोलकांना ताब्यात घेतलं. जिल्ह्यात जमावबंदी असताना कोणतीही परवानगी न घेता आंदोलन केल्यानं पोलिसांनी आंदोलकांवर कारवाई केली. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी महासंघाचे (Maratha Mahasangh) कार्यकर्ते जमले होते. त्यांनी आंदोलन करत कर्नाटक सरकार व मुख्यमंत्री बोम्मई यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.

हेही वाचा: Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

यावेळी पोलिसांनी महासंघाचे अनिल घराळ यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. बेळगावात महाराष्ट्रातील वाहनावर दगडफेक झाल्याचे कऱ्हाडातही पडसाद उमटले आहेत. रात्री कर्नाटकच्या बसवर दगडफेक झाली. आज सकाळी येथील दत्त चौकात महासंघानं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या विरोधात आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन अटकेची कारवाई केली.