सातारकरांसाठी 'मनसे'चा निर्धार; पालिका निवडणुक लढविणार

सातारकरांसाठी 'मनसे'चा निर्धार; पालिका निवडणुक लढविणार

सातारा : सातारा नगरपालिकेची हद्दवाढ झाली असून, येत्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्व जागा लढविणार आहे. पालिकेच्या कारभाराबद्दल नागरिक हैराण असून, सक्षम उमेदवार उभे करून सत्ता ताब्यात घेण्यासाठी व्यूहरचना तयार केली आहे, अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा शहर अध्यक्ष राहुल पवार यांनी दिली आहे.
 
सातारा नगरपालिका निवडणूक सर्व जागा लढविण्यास वरिष्ठांनी आदेश दिले असून, तशी तयारी सुरू केली आहे, असे सांगून राहुल पवार म्हणाले, ""पालिका सत्तेच्या सारीपाटावर फक्त दोन आघाड्या खेळत आल्या आहेत. शहराचा नाही तर नगरसेवकांचा विकास करणाऱ्या या पालिकेच्या कारभाराला नागरिक हैराण झाले आहेत. तिसरी आघाडीची होईल, अशी शक्‍यता नाही. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व वॉर्डात उमेदवार उभे करून दोन्ही आघाड्यांना आव्हान दिले जाणार आहे.''
 
शहराच्या विकासासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांची गरज आहे. सामाजिक बांधिलकीतून शहरात सक्रिय असणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवार दिली जाणार आहे. दोन्ही आघाड्यांच्या कारभारावर नाखूष असणाऱ्या सातारकरांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तिसरा पर्याय असणार असून, सत्तेत आल्यावर खऱ्या अर्थाने सातारकरांची सत्ता प्रस्थापित होईल, असेही त्यांनी नमूद केले. या वेळी दिलीप सोडमिसे, भरत रावळ, वैभव वेळापुरे, अझर शेख, गणेश पवार, अनिकेत साळुंखे, सागर पवार, अर्जुन शिंदे, प्रशांत सोडमिसे, चैतन्य जोशी, समीर दोडमनी, अविनाश भोसले, जगदीश आवटे, अविनाश दुर्गावळे, समीर गोळी आदी उपस्थित होते.

Video : आश्‍चर्य..! सूर्याचीवाडीत चक्क पट्टेरी हंस; फ्लेमिंगोचे आगमन लांबले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com