esakal | पाचगणीत गांधींच्या पाऊलखुणा जपण्याची गरज; इमारती देताहेत इतिहासाची साक्ष I Mahatma Gandhi
sakal

बोलून बातमी शोधा

Mahatma Gandhi

महात्मा गांधीजी पाचगणीत असताना बाथा हायस्कूल येथे प्रार्थनेसाठी रोज जात असत. या ठिकाणी ‘रघुपती राघव राजाराम' चा स्वर निनादत असे.

पाचगणीत गांधींच्या पाऊलखुणा जपण्याची गरज

sakal_logo
By
रविकांत बेलोशे

भिलार (सातारा) : पाचगणी आणि महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचा संबंध स्वातंत्र्यपूर्व काळातील आहे. अनेकदा महात्मा गांधी येथे वास्तव्यास येत असत. हवापालट, निवांतपणा म्हणा अथवा स्वातंत्र्याच्या काही बैठकांसाठी गांधी या ठिकाणी येत असत. त्यांच्या या काळातील काही आठवणी आजही या ठिकाणी जिवंत आहेत. परंतु, या आठवणी काळाच्या ओघात लोप पावू नयेत, हीच अपेक्षा येथील गांधीप्रेमींच्या मनात कायम आहे. यासाठी सक्षम आणि सकारात्मक उपाययोजनांची आवश्‍यकता आहे.

महात्मा गांधीजी पाचगणीत असताना बाथा हायस्कूल येथे प्रार्थनेसाठी रोज जात असत. या ठिकाणी ‘रघुपती राघव राजाराम' चा स्वर निनादत असे. या ठिकाणावर सध्या शाळा भरते. त्यामुळे ही वास्तू बाथा प्रशासनाच्या ताब्यात आहे. अशाच पद्धतीने गांधीजी ज्या विर्जी बंगल्यात राहत होते, त्या विर्जी बंगल्याच्या बाहेर गांधीजींनी एक गुलमोहराचे झाड लावले होते, ते आजही त्यांच्या अस्तित्वाच्या पुराव्याची साक्ष देते. या ठिकाणी गांधीजी आल्यावर वास्तव्य करीत असत. परंतु, हा विर्जी बंगलाही बाथा ट्रस्टने खरेदी केल्याने त्यांच्या ताब्यात आहे. बहाई भवन हे ही गांधीजींचे गुप्त बैठकांचे ठिकाण बहाई ट्रस्टकडे आहे.

हेही वाचा: UPSC मुलाखतीला मिळालेत सर्वाधिक गुण; वाचा पहिला प्रश्न आणि उत्तर

या ठिकाणी आजही मोठमोठ्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स होतात. परंतु, या सर्व जागा खासगी ट्रस्टच्या ताब्यात असल्याने या ठिकाणांना अजूनही फक्त इतिहास म्हणून पाहिले जात आहे. पाचगणी येथील कस्तुरबा गांधी रुग्णालयातील महात्मा गांधी आणि कस्तुरबा यांच्या पाऊलखुणा असणारी इमारत सध्या खासगी मालक आणि शासनाच्या कोर्टकचेऱ्यामध्ये अडकल्याने शेवटच्या घटका मोजत आहे. गांधीजींच्या पाचगणीमधील या पाऊलखुणा फक्त इतिहास न राहता चिरंतन जपल्या पाहिजेत, अशी अपेक्षा महात्मा गांधीजींच्या १५२ व्या जयंतीनिमित्ताने गांधीप्रेमींनी व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा: जगाला वेठीस धरणाऱ्या चीननं बांधलं 42 फुटबॉल ग्राउंड इतकं 'Quarantine Center'

पाचगणीमधील महात्मा गांधी यांच्या वास्तव्याच्या ज्या वास्तू आजही अबाधित आहेत, त्या पुढील पिढीला माहितीचा खजिना आहेत. परंतु, त्या जीर्ण झाल्‍या तरी गांधीजींच्या आठवणी म्‍हणून जिवंत दीपस्तंभ आहेत. त्या जपणे हे गरजेचे आहे.

-किशोरभाई पुरोहित, गांधीप्रेमी, पाचगणी

loading image
go to top