esakal | पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत; साता-यातील 28 रुग्णालयांचा समावेश

बोलून बातमी शोधा

Hospital
पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत; साता-यातील 28 रुग्णालयांचा समावेश
sakal_logo
By
- उमेश बांबरे

सातारा : महात्मा फुले जीवनदायी योजनेत सर्व रेशनकार्डधारकांचा समावेश करण्यात आला आहे. यातून पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळत आहेत; पण सध्या वाढलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे कोणत्याच रुग्णालयात बेड मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे जीवनदायी योजना बेडविनाच असल्याचे चित्र आहे. या योजनेचा रुग्णांना लाभ मिळणेही अवघड झाले आहे.

शासनाने महात्मा फुले जीवनादायी योजनेत बदल करून ही योजना आता सर्व प्रकारच्या रेशनकार्डधारकांसाठी लागू केली आहे. त्यामुळे या योजनेसाठी 28 हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक ठेवण्यात आले आहेत; पण सध्या कोरोनाचा संसर्ग वाढल्याने कोणत्याच हॉस्पिटलमध्ये बेडशिल्लक नाहीत. परिणामी जीवनदायी योजना बेडविनाच असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रातील सर्वच आर्थिकस्तरातील नागरिकांसाठी नव्याने विस्तारित महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना लागू करण्यात आली आहे. केशरी तसेच पांढऱ्या रेशनकार्डधारकांनासुद्धा पाच लाखांपर्यंतचे उपचार यामध्ये मोफत मिळणार आहेत.

'डॉक्‍टर नगराध्यक्षांना कोणतेही गांभीर्य नाही'

या योजनेच्या माध्यमातून अगदी छोट्या- छोट्या आजार, विकारापासून ते मोठमोठ्या आजारांपर्यंत अगदी सरकारी दवाखान्यामधून मिळणारे उपचारसुद्धा खासगी दवाखान्यांतून मोफत मिळतात. यासाठी युनायटेड इन्शुरन्स कंपनीच्या सहयोगातून राज्यांमध्ये सुरू झालेली ही योजना 1500 कोटी रुपयांची आहे. महात्मा फुले जीवनदायी योजनेचा पुन्हा विस्तार केला आहे. सर्वच आजार समाविष्ट असलेल्या या नव्या आणि विस्तारित योजनेचा फायदा राज्यातील सर्वच नागरिकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे; पण सध्या कोरोनाचा संसर्ग वाढल्याने मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्याही वाढली आहे. त्यामुळे रुग्णांना बेड मिळणेही अवघड झाले आहे. त्यामुळे जीवनदायी योजनेतून रुग्णांना बेड मिळणे अवघड झाले आहे.

महात्मा फुले जीवनदायी योजनेत समाविष्ट हॉस्पिटल्स अशी...

सातारा शहर : जिल्हा रुग्णालय सातारा, संजीवन हॉस्पिटल सातारा, मंगलमूर्ती हॉस्पिटल, यशवंत हॉस्पिटल, आन्को लाइफ कॅन्सर सेंटर शेंद्रे, जिल्हा कोविड हॉस्पिटल सातारा.

कऱ्हाड : कृष्णा हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल, कोळेकर हॉस्पिटल, के. एन. गुजर हॉस्पिटल, शारदा हॉस्पिटल, उपजिल्हा रुग्णालय कऱ्हाड.

फलटण : निकोप हॉस्पिटल, चिरजीवन हॉस्पिटल, फलटण लाइफलाइन हॉस्पिटल, उपजिल्हा रुग्णालय फलटण. खटाव : इन्स्टिट्यूट मेडिकल सायन्स रीसर्च.

वडूज : बी. जे. काटकर हॉस्पिटल. खंडाळा : मानसी हॉस्पिटल.

लोणंद : सावित्री हॉस्पिटल, वाई : गीतांजली हॉस्पिटल, घोटवडेकर हॉस्पिटल.

माण : इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ऍण्ड रिसर्च सेंटर मायणी, धन्वंतरी मल्टिस्पेशालिटी, डोलताडे हॉस्पिटल.

पाटण : ग्रामीण रुग्णालय. कोरेगाव : श्रीरंग नर्सिंग होम, ग्रामीण रुग्णालय, पाटील हॉस्पिटल.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली शिंगणापूरची शंभू महादेव यात्रा रद्द

सकाळी अकरानंतर किराणा मालासह दारु घरपाेच मिळेल; वाचा नवा आदेश