esakal | लसीकरणासाठी गावनिहाय याद्या करा : बाळासाहेब पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

बाळासाहेब पाटील

लसीकरणासाठी गावनिहाय याद्या करा : बाळासाहेब पाटील

sakal_logo
By
प्रशांत घाडगे -@ghadgepd

सातारा : जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी होत आहे. ही बाब सकारात्मक असून, कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला गती दिली पाहिजे. यासाठी गावनिहाय व शहरी भागात वॉर्डनिहाय यादी तयार करून वॉर्ड समित्या कार्यान्वित करण्याचे आदेश पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले आहेत.

हेही वाचा: मंत्री जितेंद्र आव्हाडांना मारहाण प्रकरणात अटक: किरीट सोमय्या

जिल्हाधिकारी कार्यालयातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या वेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘‘कोरोना प्रतिबंधक लसीकरणापासून एकही नागरिक वंचित राहणार नाही, यासाठी प्रत्येक घरनिहाय सर्वेक्षण करा. ग्रामीण भागातील सर्वेक्षणासाठी ग्रामसेवक व आशा सेविका यांची मदत घ्या. मजुरांच्या लसीकरणासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करून सकाळ व संध्याकाळी मजुरांसाठी लसीकरण करण्यात यावे.’’ या बैठकीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गौडा यांनी प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

‘‘जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी मिशन कवच कुंडलसारखी आणखी एक मोहीम दिवाळीनंतर राबवावी. या मोहिमेत विशेषत: महिलांना केंद्रबिंदू ठेवावे. जिल्ह्याला मुबलक प्रमाणात लशींचा पुरवठा होत असून, नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे यावे.’’

-बाळासाहेब पाटील; पालकमंत्री

loading image
go to top