सातारा : मांढरदेव यात्रा रद्द, यात्रेनिमित्त जमावबंदी लागू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mandhardev Yatra
सातारा : मांढरदेव यात्रा रद्द, यात्रेनिमित्त जमावबंदी लागू

सातारा : मांढरदेव यात्रा रद्द, यात्रेनिमित्त जमावबंदी लागू

वाई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व यात्रेच्या निमित्ताने होणारी गर्दी पाहता तिसऱ्या लाटेतील कोरोना(Corona) विषाणूचा संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने वाई तालुक्यातील श्री.काळेश्वरी देवी (मांढरदेव) व दावजी बुवा (सुरुर) या यात्रा (Yatra)आयोजित करण्यास मनाई करण्यात आली आहे. या यात्रेनिमित्त प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी १० जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत फौजदारी दंड संहिता प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ आदेश लागू केले आहेत.

हेही वाचा: सोलापूर : अनगर- अंजनगाव रस्त्यावर अपघात पिता-पुत्राचा मृत्यु

तालुक्यातील मांढरदेव येथील श्री. काळेश्वरी देवीची आणि सुरुर येथील धावजी बुवाची वार्षिक यात्रा येत्या १६ ते १८ जानेवारी रोजी आहे. या यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रासह कर्नाटक व आंध्र राज्यातील लाखो भाविक दरवर्षी देवीच्या दर्शनासाठी येत असतात. यात्रेचा मुख्य दिवस शांकभरी पोर्णिमेला (ता.१७ जानेवारी) रोजी आहे. या दिवशी तसेच प्रत्येक मंगळवार, शुक्रवार या देवीच्या वारी आणि आमवस्या, पोर्णिमेला अशी यात्रेपूर्वी १५ दिवस आणि यात्रेनंतर १५ दिवस याठिकाणी भाविकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वाईचे प्रांताधिकारी यांनी जमाव बंदीचा आदेश लागू केला आहे.

हेही वाचा: पुणे : अल्पयवीन मुलीची खासगी छायाचित्रे इन्स्टाग्रामवर टाकून बदनामी

या आदेशानुसार काळूबाई देवी यात्रा, मांढरदेव ता. वाई व दावजी बुवा यात्रा सुरुर यात्रा आयोजित करण्यास मनाई करण्यात येत आहे. तसेच कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षित होणार नाही अशा धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे अथवा मिरवणुकांचे आयोजन करण्यात येऊ नये. यात्रेतील धार्मिक कार्यक्रम मंदिराचे पुजारी व ट्रस्टचे सदस्य यांनीच पार पाडावी. त्याव्यतिरिक्त इतर व्यक्तींना कार्यक्रमास उपस्थित राहण्यास मनाई असेल. तसेच यात्रा कालावधीत ट्रस्टी व पुजारी वगळून इतर व्यक्तींना दर्शनासाठी बंद असेल. यात्रा कालावधीत भाविकांना तसेच स्थानिकांना रहिवासासाठी तंबू उभारण्यास तसेच पशू व पक्षी यांचा बळी देण्यास मनाई करण्यात आली आहे. १० जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत वाई तालुक्यातील मौजे मांढरदेव गावासह मांढरदेव गावापासून १० किलोमिटर परिसर, मौजे परखंदी, डुईचीवाडी, पिराचीवाडी, बालेघर, सुलतानपूर, लोहारे, वेरुळी, मुंगसेवाडी, सटालेवाडी, एमआयडीसी वाई, शहबाग, अंबाडे खिंड, बोपर्डी, धावडी फाटा रेणुसेवस्ती, गुंडेवाडी, कोचळेवाडी, काळुबाई मंदिर, जमदाडे वस्ती शेजारी वाई, वाई शहर व सुरुर तसेच खंडाळा तालुक्यातील कर्नवडी, झगलवाडी, अतिट व लिंबाचीवाडी येथील सार्वजनिक ठिकाणी अगर रस्त्यावर मोठ्या संख्यंने एकत्र येणे अथवा गर्दी करण्यासही मनाई करण्यात आली आहे.(Satara news)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top