esakal | Satara: चर खणल्याने मनस्ताप! केळघर बाजारपेठेत 20 दिवसांपासून स्थिती
sakal

बोलून बातमी शोधा

चर खणल्याने मनस्ताप

हे काम संथगतीने सुरू असल्याने व्यापारी व ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

चर खणल्याने मनस्ताप! केळघर बाजारपेठेत 20 दिवसांपासून स्थिती

sakal_logo
By
संदीप गाडवे

केळघर (सातारा): गेल्या १५ ते २० दिवसांपासून केळघर बाजारपेठेतील रस्त्यालगत गटार व नाल्यासाठी मोठमोठे चर खणून ठेवल्यामुळे दुकानदार, ग्राहक, घरमालक, शेतकरी यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. हे काम संथगतीने सुरू असल्याने व्यापारी व ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा: केळघर घाटात पर्यटकास बिबट्याचे दर्शन; पसरणी घाट रस्ता आज बंद

विटा-महाबळेश्वर रस्त्याचे चारपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. केळघर परिसरात रस्ता रुंदीकरणाचे काम कुर्मगतीने सुरू आहे. गेल्या १५ ते २० दिवस झाले मुख्य बाजारपेठेत रस्त्याच्या गावाकडील बाजूलगत सुमारे पाच ते सहा फूट चर खणले आहेत. त्यातच दररोज संध्याकाळी जोरदार पाऊस पडत आहे. परिणामी संपूर्ण गावाचे व रस्त्यावरील पाणी या चरींमध्ये साचून तलावाचे स्वरूप प्राप्त होत आहे. त्यामुळे घरांत, दुकानांत, दवाखान्यांत जाणे मुश्किल झाले असून, दुर्दैवाने एखादा अपघात होण्याची शक्यता आहे. अत्यवस्थ रुग्णांना रस्ता नसल्याने उपचारासाठी नेणेही अवघड झाले आहे.

हेही वाचा: मेढा-महाबळेश्वर मार्गावरील केळघर घाटात दरड कोसळली

ठेकेदाराने नाल्याचे काम कुठल्यातरी एका बाजूने सलग करावयास हवे होते. परंतु, तसे न करता जागोजागी चर खणल्याने व शुक्रवारी गावात जाणारा मुख्य रस्ताही बंद झाला असल्यामुळे रस्त्याखालील बाजूस राहणाऱ्या शेतकऱ्यांची जनावरे घरात बांधून ठेवण्याची वेळ आली आहे. तर ऐन सणासुदीच्या दिवसांत बाजारपेठेतील दुकानांत ग्राहक नसल्याने दुकानदारांनी संताप व्यक्त केला आहे. वास्तविक नाल्याचे काम टप्प्याटप्प्याने करावयास हवे होते. परंतु, ठेकेदाराच्या नियोजनशून्य व मनमानी कारभारामुळे जनतेला नाहक त्रास होत आहे. येत्या दोन दिवसांत नाल्याचे काम पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.

loading image
go to top