esakal | काॅंग्रेसने महाराष्ट्रात जे केलं तेच महाविकासनेही केलं; जगायची इच्छा राहिली नाही मराठ्यांचा नेता भावुक

बोलून बातमी शोधा

- Narendra Patil
काॅंग्रेसने महाराष्ट्रात जे केलं तेच महाविकासनेही केलं
sakal_logo
By
सिध्दार्थ लाटकर, राजेश पाटील

सातारा : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) आज (बुधवार) मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) महत्त्वाचा निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ठरवणाऱ्या निर्णयावर पुर्नविचार करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले. मराठा आरक्षण हे 50 टक्के आरक्षण मर्यादेचं उल्लंघन आहे. मराठा आरक्षण देताना 50 टक्के आरक्षणाची मर्यादा पार करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे वैध कारण नाही असं स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलं. आर्थिक आणि सामाजाकदृष्ट्या मागास असल्याचं कारण देत आरक्षण देण्यात आलं होतं. (maratha leader narendra patil uddhav thackreay maratha reservation devendra fadnavis satara trending news)

सर्वाेच्च न्यायालयाचा निकाल फार धक्कायदायक असल्याचे (कै.) आण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव माथाडींचे नेते नरेंद्र पाटील यांनी नमूद केेले. ते म्हणाले प्रत्यक्षात अपेक्षीत हाेते ते झालं नाही, मनाला वेदना हाेत आहेत. याेग्य युक्तीवाद केल्यानंतर माझे वडीलांनी याच आरक्षणासाठी जीव दिला. आत्ताच्या माेर्चानंतर 42 मराठा बांधवांनी जीव दिला. उद्धवसाहेबांना आम्ही सांगत हाेताे तुम्ही लक्ष घाला. काॅंग्रेस पक्षाने या महाराष्ट्रात राज्य केले. त्यांनी कधीही आरक्षणाची याेग्य भुमिका मांडली नव्हती. म्हणून आम्हांला भिती हाेती तेच झाले. देवेंद्रजींनी दिलेले आरक्षण उद्धवजींच्या चुकीच्या नियाेजनामुळे गेले.

सकाळपासून मराठा समाजातील नेते म्हणत आहेत शांत रहा. काेराेना आहे, शांत रहा. घरात झाेपून रहा. आराम करा. मराठा आरक्षणाविषयी बाहेर पडू नका. कसले तुम्ही लाेक नेेते आहात. टाळ वाजवा आता टाळ. खरं सांगताे तुम्हांला मनापासून वाईट वाटतय.

पाटील म्हणाले, काही मर्यादा आहेत. मला तर जगायची पण इच्छा राहिलेली नाही. आज तुम्ही वर्षावर बसलाय. झक मारायला बसलाय का. आता आमच्या मराठा समाजातील नेते गेलेत तेथे. या वर्षावर आता काय डाेंबलायचा हाेणार आहे का आता. वाईट वाटतय. यापेक्षा वाईट प्रतिक्रिया मी देऊ शकत नाही. मर्यादा आहेत. नाही तर माझी ग्रामीण भागाची भाषा खरं तुम्ही मराठा बांधवांचे वाईट केले. मराठ्यांचा तुम्ही विश्वासघात केला. हे तुम्हांला भाेगावे लागेल एवढं लक्षात ठेवा.

हेही वाचा: आरक्षण रद्द हा समाजाच्या दृष्टिकोनातून अत्यंत दुर्दैवी प्रसंग : संभाजीराजे

सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

हेही वाचा: 'सर्वोच्च न्यायालयाचा निकाल निराशाजनक, राज्य सरकारच्या समन्वयाच्या अभावामुळे आरक्षण रद्द'