Maratha Reservation : प्रीतिसंगमावर यशवंतराव चव्हाणांना अभिवादन करुन जरांगे-पाटील साताऱ्याला रवाना

मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांनी तिसऱ्या टप्प्यातील दौऱ्याला सुरुवात केली आहे.
Maratha Reservation Case Manoj Jarange-Patil Today Sabha Satara
Maratha Reservation Case Manoj Jarange-Patil Today Sabha Sataraesakal
Summary

मनोज जरांगे- पाटील यांनी कराड येथील यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांच्या प्रीतिसंगमावरील समाधीला अभिवादन केले.

कराड : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) पश्चिम महाराष्ट्र व कोकणाच्या दौऱ्यावर असलेले मनोज जरांगे- पाटील यांनी कराड येथील यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांच्या प्रीतिसंगमावरील समाधीला अभिवादन केले. त्यानंतर ते साताऱ्याकडे सभेला रवाना झाले.

Maratha Reservation Case Manoj Jarange-Patil Today Sabha Satara
Maratha Reservation : मनोज जरांगेंना आव्हान कशासाठी? आपण एकमेकांचे वैरी नाही; प्रकाश आंबेडकरांचे भुजबळांवर टीकास्त्र

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांनी तिसऱ्या टप्प्यातील दौऱ्याला सुरुवात केली आहे. आज (शनिवार) सकाळी कराडच्या दत्ता चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून ते ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादनासाठी रवाना झाले.

Maratha Reservation Case Manoj Jarange-Patil Today Sabha Satara
Maratha Reservation : 'एक मराठा, लाख मराठा'चा कऱ्हाडात जयघोष; जरांगेंना ऐकण्यासाठी कडाक्याच्या थंडीतही एकवटला समाज

यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर ते सर सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या तळबीड येथील समाधीस अभिवादन करून राजधानी साताऱ्यास रवाना होणार आहेत. सातारा येथे राजवाडा नजिकच्या गांधी मैदानावर त्यांची सभा होणार आहे, त्यासाठी जयत तयारीही करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com