esakal | बैलबाजारचा रस्ता राजकीय खोड्याने रखडला; नगराध्यक्षा रोहिणी शिंदेंचा आरोप I Karad
sakal

बोलून बातमी शोधा

Mayor Rohini Shinde

मार्केट यार्ड गेट क्रमांक एक ते बैलबाजाराकडे जाणाऱ्या रस्त्याबाबत महिन्यात दोन वेळा फ्लेक्स झळकले होते.

बैलबाजारचा रस्ता राजकीय खोड्याने रखडला : नगराध्यक्षा शिंदे

sakal_logo
By
सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा) : महिनाभरापासून फ्लेक्सबाजीने गाजणाऱ्या येथील मार्केट यार्ड (Market Yard) ते बैलबाजाराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाला २०१९ मध्येच मंजुरी दिली आहे. मात्र, काही राजकीय व्यक्तींनी खो घातल्याने काम रखडले आहे. ते काम आता त्वरित सुरू करण्याच्या सूचना नगराध्यक्षा रोहिणी शिंदे (Mayor Rohini Shinde) यांना दिल्या.

हेही वाचा: एमआयएम मुस्लिमांसाठी 'यम', तर ओवैसी 'जीना पार्ट टू'

नगराध्यक्षा शिंदे यांनी अधिकाऱ्यांसमवेत रस्त्याची प्रत्यक्ष जावून पाहणी केली. तेथील नागरिकांशीही त्यांनी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्यांच्यासोबत पालिकेचे नगरअभियंता एम. एच. पाटील, अभियंता धायगुडे यांच्यासह सामजिक कार्यकर्ते इंद्रजित भोपते, नीलेश वास्के, गणेश पवार, मस्तान आतार, विशाल देशमुख, विशाल भोसले, अभिजित भोपते उपस्थित होते.

हेही वाचा: संपूर्ण महाराष्ट्राला माहितीय मी कसा आहे : अजित पवार

मार्केट यार्ड गेट क्रमांक एक ते बैलबाजाराकडे जाणाऱ्या रस्त्याबाबत महिन्यात दोन वेळा फ्लेक्स झळकले होते. सुरवातीला रस्ता दुरुस्तीसाठी हिंदीतून स्लोगन लिहून फ्लेक्स झळकले होते. महिनाभरात काम पूर्ण करण्याचे आश्वासन पूर्ण न झाल्याने क्या हुआ तेरा वादा... अशा आशयाचे फ्लेक्स काल झळकावून रस्त्याच्या कामाचे वाभाडे काढले होते. त्याच रस्त्याची नगराध्यक्षा शिंदे यांनी अधिकाऱ्यांसमवेत जावून पाहणी केली.

loading image
go to top