

Satara police displaying the seized MD drugs worth ₹115 crore after a major narcotics raid.
Sakal
सातारा: जावळी तालुक्यातील सावरी येथील ड्रग्ज निर्मितीच्या कारखान्यावर मुंबई पोलिसांनी काल टाकलेल्या छाप्यात ११५ कोटींचा मुद्देमाल जप्त केला होता. याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या चौघांना रात्री उशिरा मेढा न्यायालयात दाखल करून त्यांना अधिक तपासासाठी मुंबईला नेण्यात आले. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या चौघांना १९ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यांच्याकडून अधिक माहिती उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.