'मुंबईवरून आलो की, बंदूक घेऊन..'; सोशल मीडियावर व्हायला गेला हिरो अन्..

Forest Department Medha
Forest Department Medhaesakal
Summary

नितीननं फेसबुकवर शिकारीच्या उद्देशानं पोस्ट टाकली होती; पण..

कास (सातारा) : सोशल मीडियावर (Social Media) आपल्या मित्रमंडळीत क्रेज दाखविण्याच्या उद्देशानं वादग्रस्त पोस्ट करणे एकाला चांगलंच महागात पडलं असून वनविभागाचा (Forest Department) चौकशीचा ससेमिरा पाठी लागला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असं की, मौजे चिकणवाडी (करंडी, ता. मेढा) या वस्तीतील नितीन आनंदा चिकणे यानं स्वत:च्या फेसबुक (Facebook) अकाऊंटला शिकारीच्या उद्देशानं पोस्ट टाकली.

मुंबईवरून गावाला आलो की, आपला आवडता छंद बंदूक घेऊन शिकार करणं, वाघरी लावणं असं बेधडक लिहून फेसबुकवर टाकलं. कायतरी सापडणारच, असा अतिआत्मविश्वासही व्यक्त केला. वरून शिकार करण्याच्या ठिकाणचे फोटोही टाकले. त्याची ही पोस्ट व्हायरल झाली आणि नितीन वनविभागाच्या रडारवर आला. मेढा वनक्षेत्रपाल (Medha Forest Ranger) रंजनसिंह परदेशी आपल्या सहकाऱ्यांसह तातडीनं चिकणवाडी गाठली. वनविभागाचा ताफा बघून नितीनला घामच फुटला. वनविभागानं चौकशीला सुरुवात करताच नितीननं सदर पोस्ट दारूच्या नशेत मित्रांच्या नजरेत प्रतिष्ठा वाढविण्याच्या उद्देशानं टाकली असल्याचं सांगितलं. शिकारीचा उद्देश नसल्याचं त्यांनी सांगितलं. पंचा समक्ष नितीन चिकणे यांच्या घराची झडती घेतली असता कोणत्याही प्रकारचं शिजवलेलं अथवा कच्चं मांस आढळून आलं नाही. घरातील लाकडी कपाटात दोन वडिलोपार्जित जुनी वाघरी (जाळी) मिळून आल्या.

Forest Department Medha
Forest Department Medha
Forest Department Medha
'द कश्मीर फाइल्स'चा दहशतवाद्यांशी थेट संबंध : जीतनराम मांझी

फेसबुक पोस्टमध्ये चार ठिकाणी वाघरी लावण्याचा उल्लेख केला होता. केलेल्या पाहणीत त्या ठिकाणी वाघरी लावल्याच्या खुणा दिसून आले नाहीत. नितीननं पोस्टमध्ये विशेष टिप लिहून दिमाखात लायसनवाली बंदूक असल्याचा उल्लेख पोस्टमध्ये केला होता. त्याची चौकशी केली असता, त्याचे आजोबा रामचंद्र हरिबा चिकणे यांची नावे परवाना असलेली बंदूक मेढा पोलीस स्टेशन (Medha Police Station) येथे जमा केल्याचे पावती वरून स्पष्ट झाले. नितीन चिकणेला अधिक चौकशीसाठी मेढा वनपरिक्षेत्र कार्यालय येथे आणण्यात आलं असून पुढील तपास उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक सुधीर सोनवले यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल रंजन सिंह परदेशी, वनपाल आर. एस. शेख, वनरक्षक निलेश रजपुत, आर. एस. कांबळे करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com