"काडसिद्धेश्‍वर'मध्ये प्लाझ्मा थेरपीस प्रयत्न करू : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

राजेंद्र वाघ
Sunday, 20 September 2020

याप्रसंगी नगराध्यक्षा रेश्‍मा कोकरे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार रोहिणी शिंदे, गटविकास अधिकारी क्रांती बोराटे, मुख्याधिकारी विजया घाडगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र जाधव, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. कर्पे, किरण बर्गे, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, महेश बर्गे, रमेश उबाळे, राहुल बर्गे आदी प्रमुख उपस्थित होते.
 

कोरेगाव (जि. सातारा) : काडसिद्धेश्‍वर महाराज यांच्या नावाने कोविड सेंटरची आमदार महेश शिंदे यांनी उभारणी करून लोकसेवेचे व्रत जोपासले आहे. त्यांच्या मागणीनुसार या ठिकाणी प्लाझ्मा थेरपी सेंटर सुरू करण्यास मंजुरी मिळवण्यासाठी आरोग्यमंत्र्यांशी बोलून प्रयत्न करेन, अशी ग्वाही गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. आमदार महेश शिंदे यांनी येथे उभारलेल्या कोविड सेंटरचे लोकार्पण श्री. देसाई यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले,""लोकांचा जीव वाचवणे यापेक्षा दुसरे मोठे काम नाही. ज्यांनी निवडून दिले, ज्यांचे आपण प्रतिनिधित्व करतो, अशा लोकांना वैद्यकीय सुविधा मिळवून देण्याच्या कर्तव्य भावनेतून कार्यरत असलेले महेश शिंदे यांच्यासारख्या लोकप्रतिनिंधीचीच या ठिकाणी गरज आहे. या सेंटरला प्रशासनाने आवश्‍यक सर्व सहकार्य करावे.''
 
महेश शिंदे म्हणाले,""गेली दहा-पंधरा वर्षे मी या मतदारसंघात झटून काम केले. या ठिकाणची संघटना मजबूत व सर्वांसाठी झटणारी आहे. गेल्या निवडणुकीत सर्वांनी मनापासून काम केले. दरम्यान, कोरोनाचे संकट आले. त्यानंतर मी बूथ कार्यकर्त्यांची बैठक घेऊन लोकांना आवश्‍यक साहित्याचे वाटप केले. या काळात आशा स्वयंसेविकांनी मोठे काम केले आहे. त्यांना सेवेत कायम करून आठ हजारांचे किमान वेतन मिळावे, यासाठी मंत्री देसाई यांनी येत्या अधिवेशनात पाठपुरावा करावा.''

घर खरेदीदारांत कहीं खुशी, कहीं गम; दरवाढीचा सर्वसामान्यांना धक्का!

 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा समन्वयक मुकुंद आफळे म्हणाले,""महेश शिंदे संघाच्या विचारधारेतूनच मोठे झाले आहेत. समाजाबद्दलच्या जाणिवेतूनच त्यांनी स्वखर्चातून हे कोविड सेंटर उभारले आहे. समाजाला सोबत घेऊन काम करण्याच्या संघाच्या धोरणानुसार त्यांची वाटचाल सुरू असल्याने सर्वांनी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे, ही काळाची गरज आहे. संघाच्या माध्यमातून आम्ही कायम त्यांच्या पाठीशी आहोत.''

Sunday Interview : पोलिसांसाठी स्वतंत्र कोविड हॉस्पिटल; उपराजधानीत एकही गुंड शिल्लक राहणार नाही
 
सुनील खत्री यांचेही भाषण झाले. संदीप शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रवी साळुंखे यांनी आभार मानले. याप्रसंगी नगराध्यक्षा रेश्‍मा कोकरे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार रोहिणी शिंदे, गटविकास अधिकारी क्रांती बोराटे, मुख्याधिकारी विजया घाडगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र जाधव, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. कर्पे, किरण बर्गे, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, महेश बर्गे, रमेश उबाळे, राहुल बर्गे आदी प्रमुख उपस्थित होते.

व्यवहारात फसवणूकप्रकरणी साताऱ्यातील एजंटावर गुन्हा

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Shambhuraj Desai Assures Plasma Therapy In Koregaon Satara News