
वाईतील बेपत्ता युवकाचा मृतदेह सापडला; वडिलांचा घातपाताचा आरोप
वाई (सातारा) : येथील सोनगीरवाडीतील अभय शशिकांत जावलीकर (वय १७ वर्षे) हा मंगळवारी (ता. ५) पासून बेपत्ता होता. काल रात्री व्याहळी रोडवर एकसर येथे तो मृत अवस्थेत आढळला. वाई पोलीस ठाण्यात या घटनेची अकस्मात मयत म्हणून नोंद झालीय. लावणी सम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांचा तो नातू होता.
हेही वाचा: अविवाहित असल्याचे सांगून बलात्कार; प्रेयसीने प्राशन केले विष
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अभय जावळीकर हा मंगळवारी (ता. ५) रात्री 9.30 वाजता दुचाकी (क्र. एम एच ११- ८४२३) वरून काही कामानिमित्ताने घरातून बाहेर पडला होता. मात्र, दुसऱ्या दिवशीही तो घरी परत आला नाही. नातेवाईक त्याचा शोध घेत होते. दरम्यान, काल रात्री तो वाई-व्याहळी रोड एकसर येथे मृत अवस्थेत सापडला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रितसर पंचनामा केला.
हेही वाचा: पुणे : आर्यन खानसोबत सेल्फी घेणारा के. पी. गोसावी फरार आरोपी
यावेळी घटनास्थळी श्वान पथक, ठसेतज्ञ यांना पाचारण करण्यात आले होते. सकाळी शवविच्छेदन करण्यात आले. त्याने विष घेऊन आत्महत्या केल्याचे समोर येत असून या घटनेची अकस्मात मयत म्हणून नोंद करून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. दरम्यान, आपल्या मुलाने आत्महत्या केली नसून त्याचा घातपात झाल्याची शक्यता वडील शशिकांत जावळीकर यांनी वर्तवली असून याबाबत वाई पोलिसांना निवेदन देणार असल्याचे सांगितले.
Web Title: Missing Youth Of Wai Found Dead Father Alleged Conspiracy
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..