भाजप आमदार जयकुमार गोरेंच्या जामीन अर्जाची उद्या सुनावणी

Jayakumar Gore
Jayakumar Goreesakal
Summary

अटकपूर्व जामीन अर्ज मिळण्यासाठी गोरेंनी वडूज न्यायालयात अर्ज केला होता.

सातारा : मायणी (ता. खटाव) येथे मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार केल्याच्या गुन्ह्यातील अटकपूर्व जामिनाचा अर्ज वडूजऐवजी अन्य न्यायालयात चालविण्यासाठी आमदार जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांच्या वतीने जिल्हा न्यायालयात अर्ज करण्यात आला. त्यावर उद्या सुनावणी होणार आहे.

मृत भिसे यांची बोगस कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी आमदार जयकुमार गोरे, दत्तात्रय कोंडिबा घुटुगडे (विरळी, ता. माण), महेश पोपट बोराटे (बिदाल, ता. माण) व अज्ञात दोघांवर वडूज पोलिस ठाण्यात (Vaduj Police Station) गुन्हा दाखल झाला. याबाबत महादेव पिराजी भिसे यांनी दहिवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Jayakumar Gore
संभाजी भिडे चक्कर येऊन सायकलवरुन पडले, खुब्याला लागला मुक्का मार

या गुन्ह्यामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज मिळण्यासाठी गोरे यांनी वडूज न्यायालयात (Vaduj Court) अर्ज केला होता; परंतु या अर्जावरील सुनावणी अन्य न्यायालयात व्हावी, यासाठी त्यांनी सातारा न्यायालयात (Satara Court) धाव घेतली आहे. याबाबतचा अर्ज त्यांनी जिल्हा न्यायालयात दाखल केला आहे. त्यावर सरकार पक्षाचे म्हणणे मागविण्यात आले आहे. सुनावणीसाठी उद्याची तारीख ठेवण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com