esakal | कोविड योद्ध्यांना न्याय देणार; आमदार जयकुमार गोरेंची ग्वाही
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Jaykumar Gore

कोविड योद्धा कर्मचाऱ्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत काम केले आहे.

कोविड योद्ध्यांना न्याय देणार; आमदार जयकुमार गोरेंची ग्वाही

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : कोविड योद्धा (Covid warriors) कर्मचाऱ्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत काम केले आहे. त्यांचे मूल्यमापन करून त्यांना शासनाने पुन्हा सेवेत सामावून घ्यावे. जोपर्यंत कोविड आहे, तोपर्यंत या कर्मचाऱ्यांना कायम कामावर ठेवले पाहिजे. कोविड कर्मचाऱ्यांच्या न्यायासाठी मी त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही आमदार जयकुमार गोरे (MLA Jaykumar Gore) यांनी दिली.

शासकीय सेवेत सामावून घ्यावे, यासह इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या जिल्ह्यातील कोविड योद्धा कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास आमदार गोरे यांनी भेट दिली. या वेळी या कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांच्या आंदोलनास त्यांनी पाठिंबा दिला. आमदार गोरे म्हणाले,‘‘ कोविड कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आलो होतो. अडचणीच्या परिस्थितीत या कर्मचाऱ्यांनी काम केलेले आहे. त्यांनी सेवा म्हणून स्वत:चा जीव धोक्यात घालून सेवा म्हणून या कामाकडे त्यांनी पाहिले आहे. त्यांच्या या कामाचे जिल्हा प्रशासनासह शासनानेही कौतुक केले आहे.

हेही वाचा: साताऱ्यात सत्ताधारी-विरोधकांत खडाजंगी; वादग्रस्‍त चार विषय स्‍थगित

या कर्मचाऱ्यांच्या विषयी विधानसभेत चर्चा झाली होती. त्यापैकी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या भरतीत या कर्मचाऱ्यांना पाच टक्के जागा राखीव ठेवण्यात येतील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. पण, शासनाने त्यांना कामावरून काढून त्यांच्या कामाचे मूल्यमापन करण्याऐवजी त्यांचे अवमूल्यन सुरू केले आहे. आता ई- टेंडर काढून शासन एजन्सी नेमत असून, या एजन्सीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना पैसे दिले जाणार आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना किती पैसे मिळणार, हा प्रश्न आहे. ’’ या वेळी कोरोना योद्धा कर्मचारी परिषदेचे राज्य सरचिटणीस श्रीनिक काळे, सहसंयोजक सोहेल पठाण, औषध निर्माता अधिकारी विराज शेटे, जिल्हा कार्यकारिणीतील उमेश गायकवाड, डॉ. विशाल वीरकर, सूरज शिंदे, सुषमा चव्हाण, गौरी भोसले, प्रज्ञा गायकवाड, दिक्षा धोत्रे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: एक गाव एक गणपती’साठी पुढाकार घ्या : पोलिस उपाधीक्षक रणजित पाटील

loading image
go to top