
Priyanka Mohite proudly raises the Indian tricolor atop Mount Manaslu after 16 hours of strenuous climbing.
Sakal
-सिद्धार्थ लाटकर
सातारा: येथील गिर्यारोहक प्रियांका मोहिते हिने माऊंट मनास्लू हे जगातील आठव्या क्रमांकाच्या सर्वोच्च शिखरावर नुकताच देशाचा तिरंगा फडकावला आहे. सुमारे आठ हजार १६३ मीटर उंचीच्या माऊंट मनास्लूवर पाऊल ठेवण्यासाठी प्रियांकाला तब्बल १६ तास लागले. हिमालयाच्या विशाल हृदयात कोरला गेलेला हा क्षण केवळ विजयाचा नाही, तर चिकाटी, जिद्द आणि न थकणाऱ्या ध्यासाचे प्रतीक आहे, असे तिच्या यशानंतर निकटवर्तीयांनी नमूद केले.