esakal | नगरोत्थान योजनेतून 28 कोटी देणार; खासदार उदयनराजेंची माहिती I Udayanraje Bhosale
sakal

बोलून बातमी शोधा

Udayanraje Bhosale

शाहूनगर भागाला स्वतंत्र ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था नसल्याने नागरी समस्या मोठ्या प्रमाणात होत्या.

नगरोत्थान योजनेतून 28 कोटी देणार; खासदार उदयनराजेंची माहिती

sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : शाहूनगरमधील रहिवाशांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत (Maharashtra Jeevan Pradhikaran) नगरोत्थान योजनेतून (Urban development plan) सुमारे २८ कोटी रुपयांची नवीन नळ पाणीपुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यासाठी नगरपालिकेचा २५ टक्के आणि राज्य शासनाचा ७५ टक्के वाटा राहणार आहे. लवकरच ही योजना मार्गी लावून शाहूनगर, विलासपूर, गोळीबार मैदान, पिरवाडी असा संपूर्ण त्रिशंकू भागातील सर्व कुटुंबांना २०५४ ची लोकसंख्या विचारात घेऊन दरडोई १३५ लिटर पाणीपुरवठा नियमितपणे होणार आहे, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात उदयनराजेंनी म्हटले, की शाहूनगर भागाला स्वतंत्र ग्रामिण स्थानिक स्वराज्य संस्था नसल्याने नागरी समस्या मोठ्या प्रमाणात होत्या. या भागाला जीवन प्राधिकरणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. तथापि, दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असलेली लोकसंख्या आणि होणारा पाणीपुरवठा अपुरा पडत होता. हा संपूर्ण परिसर पालिकेच्या अखत्यारित आल्याने येथील पाणी प्रश्‍न सोडविण्याबाबत प्राधान्य देणे गरजेचे होते. त्यानुसार नगरपालिका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या संयुक्त माध्यमातून नगरोत्थान योजनेतून या भागाकरिता सुमारे २८ कोटी रुपयांची शाहूनगर (शहरी) नळ पाणीपुरवठा (नगरोत्थान) योजनेचा परिपूर्ण प्रस्ताव तयार करून राज्य शासनाकडे सादर केला आहे.

हेही वाचा: 24 घोटाळे उघड, त्यात ठाकरे सरकारमधील 18 नेत्यांची नावं : सोमय्या

यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा हिस्सा म्हणून सुमारे सात कोटींपेक्षा जास्त निधी सातारा पालिकेच्या माध्यमातून दिला जाणार आहे. राज्य शासनाने ७५ टक्के म्हणजेच २१ कोटींपेक्षा जास्त निधी उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. या योजनेसाठी निधीची कमतरता भासणार नाही आणि योजनेला अंतिम मंजुरीही लवकरात लवकर मिळेल, असा विश्वास उदयनराजेंनी पत्रकातून व्यक्त केला आहे. आगामी २०५४ ची लोकसंख्या विचारात घेऊन या परिसराला पाण्याची कमतरता भासणार नाही, याची दक्षता घेतली आहे. या योजनेचा कृष्णा नदी उद्‌भव निश्‍चित करण्यात आलेला आहे. तेथून एमजेपीच्या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पाणी आणण्यात येणार आहे.

हेही वाचा: चिपी विमानतळ : मुख्यमंत्र्यांची केंद्रीयमंत्र्यासोबत आज महत्वपूर्ण बैठक

loading image
go to top