Udayanraje Bhosale : उदयनराजेंनी अमित ठाकरेंना दिली खास भेट; चर्चेला उधाण

'राज'पुत्र अमित ठाकरे उदयनराजेंच्या भेटीला, काय झाली चर्चा?
Udayanraje Bhosale
Udayanraje BhosaleEsakal

मनसे नेते आणि विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली. अमित ठाकरे हे सध्या त्यांच्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. अमित ठाकरे आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यात या भेटीदरम्यान विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी उदयनराजेंनी अमित ठाकरेंना खास भेट दिली. जेव्हा उदयनराजेंनी पत्रकारांना काय भेट दिली तेव्हा अमित ठाकरे चांगलेच लाजले आणि सगळेच हसू लागले.

अमित ठाकरे यांनी साताऱ्यात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधी स्थळाची भेट देत पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरुवात केली. यानंतर त्यांनी शिवतिर्थावर नतमस्तक होवून खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली आहे. अमित ठाकरे हे आज सातारा दौऱ्यावर असून ते विद्यार्थी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. साताऱ्यात पक्षाची मोर्चे बांधणी करण्यासाठी विशेषतः हा अमित ठाकरे यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. सध्या मनसे नेते अमित राज ठाकरे यांचे महासंपर्क अभियान राज्यात सुरु आहे.

Udayanraje Bhosale
Amit Thackeray : राजकीय समीकरण बदलणार; 'राज'पुत्र अमित ठाकरे उदयनराजेंच्या भेटीला, काय झाली चर्चा?

तर खासदार उदयनराजे भोसले बोलताना म्हणाले की, अमित घरी आल्यावर मला माझा मुलगा घरी आल्यासारखं वाटलं. अमित सारख्या तरुण नेत्यांनी पुढं आलं पाहिजे आणि लोकांची त्यांच्या माध्यमातून सेवा केली पाहिजे ठाकरे घराण्याचा इतिहास मोठा आहे. अगदी प्रबोधकार ठाकरेंपासून बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे या सगळ्यांचा त्यांनी नाव लौकीक केला पाहिजे, अमित ठाकरेंचा फॅन फॉलोईंग जोरात आहे असं ते म्हणाले आहेत.

Udayanraje Bhosale
Pune Election : चिंचवडमध्ये भाजपचं ठरलं? शंकर जगताप-फडणवीस यांच्या भेटीने चर्चांना उधाण

या भेटीदरम्यान उदयनराजेंनी अमित ठाकरेंना एक खास परफ्युम भेट दिला आहे. हाच परफ्युम का हे सुद्धा सांगितलं. 'Bvlgari men हा परफ्युम खासदार उदयनराजे यांनी अमित ठाकरे यांना भेट दिला यावेळी 'तू लहान राहिला नाहीस मोठा माणूस झाला आहे आणि आमच्या सगळ्यांची काळजी घेतली पाहिजेस म्हणून हा परफ्युम दिला आहे, असं उदयनराजे भोसले म्हणताच शेजारी अमित ठाकरें हसले.

तर भेटीवर प्रतिक्रिया देताना अमित ठाकरे म्हणाले की, साताऱ्यात आलो आणि राजेंना भेटलो नाही असं होवू शकत नाही. ही भेट राजकीय नव्हती वैयक्तिक होती, असं अमित ठाकरे यांनी सांगितलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com