'या' कारणामुळंच सोमय्यांवर शिवसैनिकांचा प्राणघातक हल्ला : उदयनराजे

सोमय्यांच्या मुद्यांचा विरोध गुद्यानं केला : उदयनराजे
Udayanraje Bhosale met on Kirit Somaiya
Udayanraje Bhosale met on Kirit Somaiyaesakal
Summary

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्‍या यांना शिवसैनिकांनी अडवत धक्काबुक्की केलीय.

सातारा : भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्‍या (Kirit Somaiya) यांना काल पुणे महानगरपालिकेच्‍या (Pune Municipal Corporation) आवारात शिवसैनिकांनी अडवत धक्काबुक्की केली होती. यावेळी पडल्‍याने सोमय्‍या हे जखमी झाले असून त्‍यांच्‍यावर पुणे येथे उपचार सुरु आहेत. काल रात्री त्‍यांची खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी भेट घेत तब्‍यतेची चौकशी केली. चौकशी केल्‍यानंतर सदर घटना राज्‍यात झुंडशाहीत सुरु नांदी असल्‍याची प्रतिक्रिया त्‍यांनी नोंदवली.

किरीट सोमय्‍या हे काल पुणे येथे आले होते. पुणे येथे आल्‍यानंतर ते पुणे महानगर पालिकेतील भाजपा नगरसेवकांना भेटण्‍यासाठी त्‍याठिकाणी गेले होते. यावेळी महानगरपालिका कार्यालयाच्‍या प्रवेशव्‍दारावर काही शिवसैनिक (Shiv Sainik) उभे होते. त्‍यांनी सोमय्‍या यांना पाहून घोषणाबाजी करत निवेदन देण्‍याचा प्रयत्‍न केला. याचदरम्‍यान काही शिवसैनिकांनी सोमय्‍या यांना धक्काबुक्की करण्‍यास सुरुवात केली. धक्काबुक्की करणाऱ्यांना अडविण्‍याचा प्रत्‍यय सुरक्षारक्षक करत असतानाच गोंधळ उडाला आणि सोमय्‍या यांना काहीजणांनी सुरक्षित बाहेर आणण्‍यास सुरुवात केली. याचवेळी धक्का लागल्‍याने सोमय्‍या हे पायऱ्यांवरुन खाली पडले व जखमी झाले.

Udayanraje Bhosale met on Kirit Somaiya
Udayanraje Bhosale राष्ट्रवादीत परत जाणार? राजेंनी स्पष्ट केली भूमिका

जखमी सोमय्‍या यांना चारचाकीत बसवत त्‍यांच्‍या सुरक्षारक्षकांनी सुरक्षित ठिकाणी हलवले. पडल्‍याने तसेच धक्काबुक्कीत सोमय्‍या यांच्‍या हातास तसेच कमरेस दुखापत झाली असल्‍याने त्‍यांना पुणे येथील रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले. येथे त्‍यांच्‍यावर उपचार सुरु असून माजी खासदार किरीट सोमय्या हे सातत्याने भ्रष्टाचाराची पोल खोलत असल्याने त्यांच्यावर झालेला प्राणघातक ठरणारा हल्ला अतिशय निंदनिय आहे. सोमय्यांच्या मुद्यांचा विरोध गुद्याने केला गेला असल्याने, लोकशाही संकटात सापडली आहे. असा हल्ला करुन, मा. किरीट सोमय्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न झाला आहे. ही घटना म्हणजे वैचारिक महाराष्ट्रातील लोकशाहीची अधोगती आणि झुंडशाहीची नांदी आहे. देशातील कोणत्याही व्यक्तीवर अश्या हल्याच्या घटना घडल्यास अश्या घटनेचे कोणीही समर्थन करु शकणार नाही, असं त्यांनी म्हंटलंय.

Udayanraje Bhosale met on Kirit Somaiya
पुण्यात भाजपला पडणार खिंडार; 25 नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com