

Mandhardevi Tragedy Nana Patekar Rushed to Wai and Stood by Victims at the Hospital During the Crisis
esakal
-सुधीर जाधव, सिद्धार्थ लाटकर
सातारा : सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध मांढरदेवी (काळूबाई) मंदिरातील भीषण चेंगराचेंगरीची दुर्घटना २५ जानेवारी २००५ रोजी घडली होती. या अत्यंत दुर्दैवी घटनेत अनेक भाविकांचा चिरडून व आगीत होरपळून मृत्यू झाला होता, तसेच भाविक गंभीर जखमी झाले होते. भीषण चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर अभिनेते नाना पाटेकर यांनी तातडीने वाई गाठली. वाईतील शासकीय ग्रामीण रुग्णालयातील चित्र पाहून नाना गलबलून गेले. स्वत-ला सावरत त्यांनी दिवसभर रुग्णालयात थांबून जखमींची विचारपूस केली. अनेकांना उपचार मिळवून देण्याबरोबरच मृतांच्या नातेवाइकांना धीर दिला. संकटाच्या काळात नानांनी पीडित आणि प्रशासनाला मोलाचा साथ दिली.