'शरद पवार, अजित पवारांच्या नावावर ओळख निर्माण करणाऱ्यांनी मोठेपणा दाखवला असता तर..' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar

शरद पवार, अजित पवारांच्या नावावर स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्यांनी निवडणुकीत मनाचा मोठेपणा दाखवला असता तर...

'शरद पवारांच्या नावावर ओळख निर्माण करणाऱ्यांनी मोठेपणा दाखवला असता तर..'

sakal_logo
By
राजेंद्र वाघ

कोरेगाव (सातारा) : राजकारणामध्ये निवडणुका झाल्याच पाहिजेत, त्यातून काही तरी शिकायला मिळते, या मताचा मी आहे. सर्वच उमेदवार बिनविरोध झाले असते, तर आम्हाला तुमच्यापुढे म्हणजे मतदारांपुढे येण्याची संधीच मिळाली नसती. यशवंतराव चव्हाण, आबासाहेब वीर यांच्या विचारधारेतून सुरू असलेले जिल्हा बँकेचे (Satara Bank Election) काम यापुढेही अविरत सुरू ठेवण्यासाठी सहकार पॅनेलच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी येथे केले.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सहकार पॅनेलच्या प्रचारानिमित्त येथे झालेल्या मतदारांच्या मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, दीपक चव्हाण, सुनील माने, नितीन पाटील, लहूराज जाधव, उमेदवार शिवाजीराव महाडिक, प्रदीप विधाते, रामभाऊ लेंभे, कांचन साळुंखे, राजश्री पाटील, तसेच शहाजी क्षीरसागर, मंगेश धुमाळ, राजाभाऊ जगदाळे, संजय साळुंखे, कांतिलाल पाटील, सुरेश साळुंखे, लालासाहेब शिंदे, तानाजीराव मदने, सुरेखा पाटील, संजय झंवर, शीला झांजुर्णे, भास्कर कदम, श्रीमंत झांजुर्णे, प्रताप कुमुकले आदी प्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘‘बँकेच्या निवडणुकीसाठी कोरेगावातून अनेकांनी इच्छा व्यक्त केली होती. त्यापैकी सुनील माने यांनी त्यांच्या भावना बोलून दाखवल्या; पण कोण काय कमेंट करतोय, याकडे लक्ष देऊ नका. अफवा, चर्चांकडे दुर्लक्ष करा. आपल्या बँकेने आजवर अनेक पुरस्कार मिळवून लौकिक कायम ठेवला आहे.

हेही वाचा: दगा फटका टाळण्यासाठी 28 जणांना सोबत घेऊन रांजणे 'नॉट रिचेबल'

Balasaheb Patil

Balasaheb Patil

गेल्या सहा वर्षांत अधिक चांगले काम झाल्यामुळेच ११ संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मार्गदर्शन वेळोवेळी मिळत आहे. सचिवांच्या प्रश्नांची सोडवणूक करायची आहे, बँकेच्या शाखांचा विस्तार करायचा आहे. या पार्श्वभूमीवर सहकार पॅनेलच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या.’’ आमदार शिंदे म्हणाले, ‘‘सरड्याप्रमाणे रंग बदलणारे कोरेगावात कुरबुरीचा फायदा घेण्याच्या प्रयत्नात आहेत. शरद पवार, अजित पवार या नेत्यांच्या नावावर कोरेगावात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्यांनी बँकेच्या निवडणुकीत मनाचा मोठेपणा दाखवला असता, तर त्यांच्याविषयी निश्चितच आपुलकीची भावना राहिली असती. कोरेगावात ९० पैकी ७७ मतदार राष्ट्रवादीच्या विचारांचे आहेत. त्यामुळे हे मतदार कसे फुटतील. फायद्या तोट्यापेक्षा माझ्या दृष्टीने निष्ठेला महत्त्व आहे. त्यामुळे शिवाजीराव महाडिक यांच्यासह सहकार पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी होतील.’’

हेही वाचा: विरोधकांच्या भूलथापांना बळी न पडता NCP पॅनेलला मत द्या : शिवेंद्रसिंहराजे

सुनील माने यांच्यासह माघार घेणाऱ्या व मनाचा मोठेपणा दाखवणाऱ्या सर्वांना भविष्यात राष्ट्रवादीच्या माध्यमातून संधी देण्याची ग्वाही आमदार मकरंद पाटील यांनी पक्षाच्या वतीने दिली. सुनील माने म्हणाले, ‘‘काही माणसे चुकीचा प्रचार करत आहेत. माझ्याविषयी कोणीही अपप्रचार करू नये. मी पक्षाला मानणारा कार्यकर्ता आहे. आजवर मी कोणत्याही आमिषाला बळी पडलो नाही, कधीही चुकीची भूमिका घेतली नाही. माझ्यावर शंका असेल, तर माझ्या मताचा अधिकार साहेब तुम्हाला घ्या.’’ या वेळी आमदार दीपक चव्हाण, शिवाजीराव महाडिक यांचीही भाषणे झाली. शहाजी क्षीरसागर यांनी आभार मानले.

हेही वाचा: 'निवडणुकीत गृहराज्यमंत्र्यांकडून पैशाचा वापर'

शशिकांत शिंदे आणि संघर्ष

आगामी काळात लागणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीसह विविध निवडणुकांना आपणा सर्वांना पक्ष म्हणून एकदिलाने सामोरे जावे लागेल, असे नमूद करून आमदार शशिकांत म्हणाले, ‘‘मी बँकेसाठी कोरेगावातून लढलो असतो, तर मला त्रास झाला नसता; पण कोरेगावातील स्थानिकांना संधी मिळणे आवश्यक आहे, ही माझी भावना आहे. त्यामुळे बँकेसाठी जावळीतून लढतोय आणि संघर्षाशिवाय मला काहीच मिळत नाही.’’

हेही वाचा: 'बारामतीकरांची सुपारी उचलून जिहे-कठापूर अडचणीत आणत असाल तर..'

loading image
go to top