
दहिवडी: आम्ही कधीच कर्जमाफीपासून बाजूला गेलो नाही. त्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूनेच आहोत. आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही, असं कधीही म्हणालो नाही. योग्य वेळ आल्यानंतर आम्ही कर्जमाफी देऊ, अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केली. अनिल देसाई हा माणच्या मातीशी घट्ट नाळ जोडलेला नेता आहे. त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा, असे आवाहनही त्यांनी केले.