

NCP leader Makrand Patil entrusted with full authority over Satara municipal election strategy during the Mumbai meeting.
Sakal
सातारा: जिल्ह्यात गत पालिका निवडणुकीपर्यंत बहुतांश ठिकाणी सत्तेत असणारी राष्ट्रवादी काँग्रेस यंदाच्या निवडणुकीतही आपली ‘दादा’गिरी सिद्ध करण्यासाठी सज्ज असल्याचे संकेत आज मुंबईत झालेल्या बैठकीतून देण्यात आले. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात आपले अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी, मेढा नगरपंचायतीसह सर्व पालिकांमध्ये उमेदवार उभे करण्याची तयारी पक्षाकडून करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात आवश्यकतेनुसार युती, आघाडी करण्याचे सर्वाधिकार मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील व खासदार नितीन पाटील यांच्याकडे असतील.