वाहनधारकांना खुशखबर! कऱ्हाडचा नवीन कृष्णा पूल महिनाभरात खुला

Karad-Vita Road
Karad-Vita Roadesakal

कऱ्हाड (सातारा) : कऱ्हाड ते विटा रस्त्यावरील (Karad-Vita Road) येथील कृष्णा नदीवरील (Krishna River) नवीन कृष्णा पुलाचे कामही पूर्णत्वास आले आहे. अवघ्या २० दिवसांत पूल वाहतुकीस खुला होण्याची शक्यता आहे. नवीन कृष्णा पुलाच्या काम पूर्णत्वास आल्याने रस्त्यांची रुंदी वाढणार आहे. त्यामुळे कॅनॉल चौकासह कृष्णा नाक्यावरील वाहतूक कोंडी संपणार आहे. वाहतुकीस खुला होणारा कृष्णा पूल नदीच्या तळापासून तब्बल १२५ फूट उंच आहे. त्यासाठी तब्बल ३५ कोटी खर्च आला आहे. कऱ्हाड ते विटा राष्ट्रीय महामार्गाचे (Karad to Vita National Highway) कामही अंतिम टप्प्यात आले आहे. सर्वात शेवटी सुरू झालेला अन् सर्वात आधी पूर्णत्वास आलेला प्रकल्प म्हणजे कऱ्हाड ते विटा महामार्ग होय, अशीच प्रकल्पाची ओळख आहे.

Summary

कृष्णा नदीवरील नवीन कृष्णा पुलाचे काम पूर्णत्वास आले आहे.

कऱ्हाड ते विटा महामार्गावर येथील कृष्णा नदीवर मोठा पूल झाला आहे. तो नदीच्या तळापासून तब्बल १२५ फूट उंचीचा, तर नदीच्या पाण्याच्या वरील पात्रापासून तब्बल ७० फूट उंच आहे. तो पूल कमी जागेत आहे. दोन महापूर आलेले असताना बांधलेला मोठा पूल सुस्थितीत आहे. पुलाच्या जोडरस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे. पूल बांधताना आलेल्या अभूतपूर्व पुरातूनही मार्ग काढत ते काम पूर्णत्वाकडे नेले आहे. विटा ते कडेपूरपर्यंतचा रस्ता होतोना मोठा विरोध झाला. जमीन भूसंपादन नसताना तेथील प्रश्न सोडवून ते काम मार्गी लावले आहे. कडेगावातही अनेक अडथळे पार करत काम पूर्णत्वास नेले आहे.

Karad-Vita Road
कऱ्हाड पालिकेची बिल थकीत गेल्याने वीज कनेक्शन तोडले

या रस्त्याचे कोविडच्या काळातही पूर्णत्वास गेले आहे. कऱ्हाड तालुक्यातील सैदापूर येथील पाणी निचऱ्याचा सगळ्यात किचकट व अवघड प्रश्नही मार्गी लावला आहे. सैदापूर येथील पाणी निचरा प्रश्नासाठी प्रयत्नांची पराकष्ठा केली. कागदपत्रे, मंत्री आणि आमदारांचा दौरे, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भेटीसह त्यांच्या बैठका, मोजणीसहित आंदोलनाचे इशारे अशा पातळीवर तो प्रश्न गाजला. शेताजवळून गटार खोदण्यासाठी तातडीने पाठवलेले मशिन पाठवून तेथे रस्त्यात टाकलेल्या पाइपमुळे प्रश्न सोडवला गेला. याच वर्षी काम सुरू झाले. ते याच वर्षी पूर्णही झाले. त्यासाठी सर्वांसाठी टीपीएफ तंत्र वापरले आहे.

Karad-Vita Road
योगींना रोखण्यासाठी 'काँग्रेस'ची खेळी

कृष्णा पुलाची वैशिष्ट्ये...

  • पुलाची लांबी ३२० मीटर

  • ४० मीटरचे आठ गाळे

  • पाइल फाउंडेशन पायचा प्रकार

  • सिंगल सेल बॉक्स गर्डरचे स्लॅब

  • पाया मजबुतीसाठी प्रत्येक पिलरला सहा पाइल घेतल्या आहेत.

  • कठीण दगडात दोन मीटर अँकर केले आहे.

  • आठ मीटरचा रोड वे व दीड मीटरचा पादचारी रस्ता आहे.

  • पुलावर लाइटची व्यवस्था

  • पुलाचे वय सर्वसाधारण १०० वर्ष गृहीत आहे.

  • नवीन कृष्णा पूल अत्युच्य पातळीचा आहे. त्याला महापुराचा धोका नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com