esakal | सातारा जिल्ह्यात आठ पालिकांत आता नव्याने वॉर्ड रचना
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात आठ पालिकांत आता नव्याने वॉर्ड रचना

पालिकांच्या निवडणुकाही बहुसदस्यही व नव्या वॉर्ड रचनेनुसार होणार असल्याने पालिकांच्या निवडणुकांचे पडघम वाजणार आहेत.

जिल्ह्यात आठ पालिकांत आता नव्याने वॉर्ड रचना

sakal_logo
By
सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा): जिल्ह्यातील पालिकांच्या निवडणुका यंदा बहुसदस्यीय पद्धतीने होणार आहेत. त्यावर मागील काही दिवसांपूर्वी शिक्कामोर्तब झाले. त्यात वॉर्डरचनाही नव्याने करण्याचे आदेश शासनाने दिल्याने पालिकांच्या निवडणुकीत रंगत येणार आहे. नव्याने होणारी वॉर्डरचना कशी असणार याचेही शासनाने निर्देश दिले आहेत. त्याबाबतचे अधिकृत आदेश पालिकांना मिळाले आहेत. जिल्ह्यातील कऱ्हाड, सातारा, फलटण, वाई, पाचगणी, महाबळेश्वर, रहिमतपूर, म्हसवड या पालिकांचा त्यात समावेश आहे. पालिकांच्या निवडणुकाही बहुसदस्यही व नव्या वॉर्ड रचनेनुसार होणार असल्याने पालिकांच्या निवडणुकांचे पडघम वाजणार आहेत.

हेही वाचा: कऱ्हाड सोसायटीतून बाळासाहेब की उदयसिंह?

सातारा, कऱ्हाडसह जिल्ह्यातील अन्य पालिकांच्या नव्याने होणाऱ्या वॉर्ड रचनेनुसार निवडणुकांचे पडघम वाजत आहेत. त्यात आता वॉर्ड रचना बदलाचे आदेश आल्याने पालिकांचे राजकारणही गतीत येणार आहे. वॉर्ड रचनेसाठी राजकीय जुळवा जुळवीला गतीही येईल. पालिकांच्या अधिकारीही त्या कामात आजपासून (गुरुवार) गर्क असतील. वॉर्ड रचना करताना २०११ ची लोकसंख्या गृहीत धरण्याचे आदेश कायम आहेत. लोकसंख्या, अनुसूचित जातीची व अनुसूचित जमाती लोकसंख्या व प्रगण गटाचे नकाशे उपलब्ध करून रचना करायची आहे. त्यामुळे तेही महत्त्वाचे आहे. वॉर्डाची दिशा, सरासरी लोकसंख्याही महत्त्वाची आहे. यापूर्वी सिंगल वॉर्ड गृहीत धरून वॉर्ड रचना होती, ती आता द्विसदस्यीय असल्याने वॉर्ड रचना बदलाचे निर्देश आहेत.

हेही वाचा: कऱ्हाड बाजार समितीत शेतमाल तारण कर्ज योजना

नव्याने होणारी वॉर्ड रचना महत्त्वाची आहे. ती करून त्याची मंजुरी व प्रसिद्धीसाठी अधिकारी नियुक्त होणार आहे. वॉर्ड रचनेची मुख्य जबाबदारी पालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांवर आहे. प्रारूप मान्यता व त्याच्या हरकती, बदल, सूचनेनंतरची अंतिम वॉर्ड रचना मंजुरी जिल्हाधिकारी देतील. शासनाने पालिकांच्या वॉर्डरचनेचे काम आजपासून (गुरुवार) सुरू करण्याचे निर्देश आहेत. त्यामुळे पालिकांत वॉर्डरचनेची लगबग असणार आहे. काही दिवसांत वॉर्ड रचनेचे नोटिफिकेशन लावले जाईल. पालिकांच्या मागील निवडणुका द्विसदस्यीय पद्धतीने झाल्या होत्या. त्यामुळे याही वेळी त्याच पद्धतीने होणार असल्या तरी त्यातील वॉर्डची रचना बदलली जाणार आहे. आरक्षणाबाबत ऐन वेळी कळवले जाणार असल्याचा आदेशात उल्लेख आहे.

हेही वाचा: कऱ्हाड पालिकेत टक्केवारीला राजाश्रय?

अशी होईल, वॉर्ड रचना

- वॉर्ड रचना होताना बहुतांशी दोन सदस्य, तर गरजेनुसार एखादा वॉर्ड तीन सदस्यांचा असेल

- वॉर्डातील वस्त्यांचे विभाजन होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

- अनुसूचित जाती व जमातीच्या वस्त्यांचे विभाजन न करता वॉर्ड रचना करावी.

- वॉर्डातील नागरिकांचे दळणवळण वॉर्ड रचना करताना विचारात घ्यावे.

- मूलभूत सार्वजनिक सुविधा ज्या त्या वॉर्डातच ठेवाव्या.

- वॉर्ड रचना करताना शक्यतो प्रगणक गट फोडू नयेत.

loading image
go to top