जातनिहाय जनगणनेसाठी ओबीसी संघटनेचे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जातनिहाय जनगणनेसाठी ओबीसी संघटनेचे आंदोलन

जातनिहाय जनगणनेसाठी ओबीसी संघटनेचे आंदोलन

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड : ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करून लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सातारा जिल्हा ओबीसी संघटनेच्या वतीने आज आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

हेही वाचा: महाराष्ट्रात चार दिवस पुन्हा पाऊस...हवामान विभागाचा इशारा

संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरत लोकरे, शहराध्यक्ष विनायक गायकवाड, तालुका अध्यक्ष राजेंद्र रेळेकर, महिला आघाडीच्या सुनीता दीक्षित यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी हे निवेदन दिले. निवेदनातील माहितीनुसार केंद्र सरकारने ओबीसींच्या आकडेवारीची माहिती दिली नाही. त्यामुळे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहेत.

हेही वाचा: राज्य सीआयडी परमबीर सिंहांना फरार घोषित करण्याच्या तयारीत ?

त्यासाठी २०२१ ची जनगणना जातीनिहाय करावी, मंडल आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करून भूमिहिनांना पडीक जमिनीचे वाटप करावे, ओबीसांचा नोकऱ्यातील कोटा पूर्ण करून त्यांना समाजाच्या प्रवाहाबरोबर आणावे, ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबरच विधानसभा, लोकसभेलाही लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळावे, अशी मागणी आहे. ही जनगणना झाली नाही, तर ओबीसी समाज जनगणनेवरच बहिष्कार टाकेल.

loading image
go to top