
Satara Crime:
सातारा: शहराच्या पश्चिम भागातील गडकर आळी, विठोबाचा नळ, जंगीवाड्यासह अनंत इंग्लिश स्कूल चौकात युवकांच्या दोन टोळ्यांत जुन्या भांडणाच्या वादातून हल्ला, प्रतिहल्ला करत शुक्रवारी मोठा राडा झाला. कोयता, दांडकी नाचवत मारहाण करण्यासह दुचाक्यांसह दुकानांची तोडफोड करणाऱ्या युवकांमुळे परिसरात मोठी दहशत निर्माण झाली होती. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात चार तक्रारी दाखल असू्न, यानुसार माजी नगरसेवकासह सुमारे ४० जणांहून अधिक जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.