शिवरायांच्या विचारांना अभिप्रेत असलेलं आपलं कार्य : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

शिवरायांच्या विचारांना अभिप्रेत असलेलं आपलं कार्य : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

सातारा : अतिशय कमी कालावधीत सुसज्ज असे कोविड हॉस्पिटल सुरु केल्याने रुग्णांना चांगल्या प्रकारे सुविधा मिळणार आहेत. या बरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असलेल्या संग्रहालयाचे रूपांतर कोविड हॉस्पिटलमध्ये करून त्यांच्या विचारांनाच अभिप्रेत असलेले कार्य करत असल्याचे गौरोद्गार आज (ता. ९) मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काढले.

सातारा येथे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात उभारलेल्या कोविड हॉस्पिटलच्या ऑनलाइन उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे ऑनलाइन सहभागी झाले होते. कार्यक्रमस्थळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शिवेद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे आदी उपस्थित होते.

राज्यात सर्व ठिकाणी कोविड बाधितांना उत्तम सुविधा दिल्या जात आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जगभरात लस तयार करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र, सद्यस्थितीत कोविड प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क, हात धुणे आणि अंतर राखणे या त्रिसूत्रीचा वापर करून या प्रादुर्भावाला दूर ठेवा, असेही आवाहन ठाकरे यांनी केले.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, नागरिकांच्या सेवेसाठी कोविड हॉस्पिटल उभे केल्यानंतर प्रशासनाची जबाबदारीही वाढली आहे. याचबरोबर कोरोनाशी लढताना विविध उपाययोजना करण्यासाठी पुणे विभागाला 151 कोटी दिले असून पाच जिल्ह्यापैकी सातारा जिल्ह्याला 45.59 कोटी रुपये दिल्याची माहिती त्यांनी दिली. सभापती रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, विविध आजारासारखाच कोरोनाच्या संसर्गाचा सामना करण्याची आवश्‍यकता आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. बाळासाहेब पाटील म्हणाले, सातारा जिल्ह्यातील कोविड रुग्णांची संख्या पाहता या ठिकाणी सुसज्ज हॉस्पिटलची आवश्‍यकता होती. हॉस्पिटल उभे करण्यासाठी सरकारने तत्काळ मदत केल्याने कमी कालावधीत रुग्णालय सेवेत दाखल झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

खासगी रुग्णालयांना अजित पवारांची तंबी
कोरोनाच्या काळात राज्यभरात खासगी हॉस्पिटलकडून नागरिकांची लूट होत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या पार्श्‍वभूमीवर खाजगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या एक लाखाच्या पुढच्या बिलाचे ऑडिट करुन लक्ष ठेवा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा प्रशासनाला देत खासगी रुग्णालयांना एकप्रकारे तंबीच दिली आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com