Satara: मुळीकवाडीमध्ये अफूची शेती!

लोणंद पोलिसांचा छापा; २ हजार ७३७ झाडे जप्त
crime news
crime newsesakal

लोणंद : मुळीकवाडी (ता. फलटण) येथील बाचकी नावाच्या शिवारात एका शेतकऱ्याने त्याच्या शेतातील कांद्याच्या पिकामध्ये चक्क अफू या अमली पदार्थाच्या २ हजार ७३७ झाडाची लागवड केल्याचे लोणंद पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात उघड झाले.

काल (मंगळवारी) सायंकाळी हा छापा टाकण्यात आला. या कारवाईत पोलिसांनी १२ किलो ४६० ग्रॅमचा सुमारे २ लाख ७७ हजार २०० रुपये किमतीचा अफू जप्त केला. या प्रकरणी सुरेश शिवराम पवार (वय ४६, रा. मुळीकवाडी, ता. फलटण) यास अटक केली.

crime news
Satara : महाआघाडीत बिघाडी अन् भाजपमध्ये फूट

याबाबत लोणंद पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मुळीकवाडी (ता. फलटण) येथील सुरेश शिवराम पवार याची बाचकी नावाच्या शिवारात शेतजमीन आहे आहे. यामध्ये त्याने अफू या अमली पदार्थांच्या झाडाची लागवड केली असून, तो त्याची जोपासना करत असल्याची माहिती लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर यांना सूत्राकडून मिळाली.

त्यानुसार श्री. वायकर यांनी काल सांयकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास आपले सहकारी पोलिस अधिकारी, अंमलदार, पंच यांच्या समवेत मुळीकवाडी (ता. फलटण) गावच्या हद्दीतील सुरेश शिवराम पवार याच्या शेतात जाऊन छापा टाकला.

या वेळी पोलिसांनी सुरेश शिवराम पवार यांना ताब्यात घेऊन त्याच्यासमवेत त्याच्या शेताची पाहणी केली. त्या वेळी कांद्याच्या पिकामध्ये अफूच्या झाडांची लागवड करून ती झाडे जोपासली असल्याचे दिसून आले. याबाबत अफूच्या झाडांची लागवड केल्याचे सुरेश पवार यांनी पोलिसांकडे कबुली दिली. दरम्यान त्यातील काही झाडांची बोंडे तोडली असल्याचे पोलिसांना दिसले.

crime news
Satara : भरपाईच्या प्रतीक्षेतील शेतकऱ्यांना दिलासा ; अतिवृष्टी बाधितांना सतरा कोटींची मदत

याबाबत त्यास विचारले असता त्याने झाडाची बोंडे तोडून शेजारच्या शेतातील मक्याच्या पिकामध्ये खसखस काढण्यासाठी काढून ठेवल्याचे सांगत एक बोंडे असलेली प्लॅस्टिकची पिशवीही त्याने काढून दिली. दरम्यान अफूची झाडे उपटून त्याची मोजदाद केली असता २ हजार ७३७ झाडे लावल्याचे समोर आले. सुरेश पवार याच्या शेतातून १२ किलो ४६० ग्रॅम वजनाचा सुमारे २ लाख ७७ हजार २०० रुपये किमतीची

दृष्टिक्षेपात

  • कांद्याच्या पिकामध्ये लागवड

  • झाडांची लागवड केल्याची कबुली

  • संशयित शेतकऱ्यास अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com