

Satara district administration announces paid holiday for voting; appeal-affected areas excluded.
Sakal
सातारा : जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने व दुकानांमधील कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांना पूर्ण दिवस पगारी सुटी किंवा सुटी देणे शक्य नसेल तेथे दोन ते तीन तासांची सवलत देण्याबाबत सूचित केले आहे. सुटी किंवा सवलत न दिल्यामुळे मतदाराला मतदान करणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास संबंधित आस्थापनाविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल, असा इशारा सहायक कामगार आयुक्त नितीन कवले यांनी दिला आहे.