महिला परिचारिकांना पूर्णवेळ कायम करा! राज्यभर बेमुदत आंदोलन

महिला परिचारिकांना पूर्णवेळ कायम करा! राज्यभर बेमुदत आंदोलन
Summary

विविध मागण्यांसाठी आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन

कऱ्हाड (सातारा): राज्यातील अर्धवेळ महिला परिचारिकांना पूर्णवेळ कायम करून त्यांना दरमहा 18 हजारांचे वेतनासह विविध मागण्यांसाठी आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन करत आहेत, अशी माहिती अंशकालीन महिला परिचारिका महासंघाच्या जिल्हाध्यक्षा नागरबाई खबरे यांनी दिली.

महिला परिचारिकांना पूर्णवेळ कायम करा! राज्यभर बेमुदत आंदोलन
कऱ्हाड पालिकेत राजकारण तापलं

महिला परिचारिकांच्या मागण्यासंदर्भात यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाची आत्तापर्यंत कोणीही दखल घेतली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील 470 अर्धवेळ महिला परिचर बेमुदत कामबंद आंदोलन करणार आहेत, असे स्पष्ट करून खबरे यांनी राज्यभर आंदोलन सुरू ठेवण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महिला परिचारिकांना पूर्णवेळ कायम करा! राज्यभर बेमुदत आंदोलन
Coronavirus : साताऱ्यासह कऱ्हाड, खटाव, फलटणात विळखा घट्टच!

त्या म्हणाल्या, जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत, तोपर्यंत आंदोलनातून अजिबात माघार घेतली जाणार नाही. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये कार्यरत असलेल्या अर्धवेळ महिला परिचारांना कोरोना काळात काम करताना सध्या अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कामाची वेळ ठरलेली नाही. कमी मोबदला, आरोग्याच्या सेवा सुविधा नाहीत, मासिक वेतन फक्त तीन हजार रुपये इतकेच दिले जात आहे.

महिला परिचारिकांना पूर्णवेळ कायम करा! राज्यभर बेमुदत आंदोलन
Corona Update : साताऱ्यासह कऱ्हाड, फलटण, खटावातील रुग्णांत मोठी वाढ

सातत्याने महागाईत वाढ होत असल्याने संसार चालवताना अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे सर्व अर्धवेळ परिचारिकांना कायम करून त्यांना दरमहा किमान 18 हजारांचे रुपये वेतन दिले जावे. आरोग्य कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सोई सुविधा आम्हालाही देण्यात याव्यात, अशा आमच्या मागण्या आहेत. यावेळी वैशाली गरुड, सुजाता उबाळे, सरोज मोरे, बिस्मिला मुल्ला, रंगुताई खाडे, सुनिता कदम उपस्थित होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com