
Karad Crime
कऱ्हाड : वडूज येथील एका हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत नसताना त्या नावाचा आणि स्वाक्षरीचा दुरुपयोग करून पाच रुग्णांना बनावट लॅबोरेटरीचे अहवाल तयार करून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी डॉ. संदीप मोहनराव यादव (वय ५२, रा. बनपुरीकर कॉलनी, कऱ्हाड) यांनी त्यांची, तसेच रुग्णांची फसवणूक केल्याबद्दल वडूज येथील डॉ. बी. जे. काटकर हॉस्पिटलमधील लॅबोरेटरीचे चालक, तंत्रज्ञ व संबंधित हॉस्पिटल प्रशासनाविरोधात फिर्याद दिली. संबंधित गुन्हा पुढील तपासासाठी वडूज पोलिसांकडे वर्ग केल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.