पदाधिका-यांच्या निवडीचा मुहर्त ठरला; पाटणला इच्छुकांच्या नावांची चर्चाच चर्चा

सिद्धार्थ लाटकर
Tuesday, 17 November 2020

पाटण नगरपंचायतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 14, शिवसेनेचे दोन, भारतीय जनता पक्षाचे एक सदस्य आहेत. यंदा पुन्हा राष्ट्रवादीचेच पदाधिकारी पंचायतीवर असतील यात शंका नाही.

सातारा : पटाण नगरपंचायतींचे नगराध्यक्ष संजय चव्हाण आणि उपाध्यक्ष सचिन कुंभार यांनी आपल्या पदांचे राजीनामे नुकतेच दिल्याने या दोन्ही पदांसाठीच्या निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जाहीर केला आहे. आगामी काळात या दोन्ही पदासाठी कोणाला संधी मिळणार याची चर्चा रंगू लागली आहे. 

पाटणचे नगराध्यक्ष संजय चव्हाण आणि उपाध्यक्ष सचिन कुंभार यांनी पदाचा कार्यकाल संपल्याने नुकताच राजीनामा दिला आहे. पुढील सव्वा वर्षासाठी कोणाकडे नगरपंचायतीच्या चाव्या द्यायच्या यासाठी युवा नेते सत्यजिंतसिंह पाटणकर यांची चाचपणी सुरु झालेली आहे. सध्या तरी नगरसेवक अजय कावडे, सचिन कुंभार, विजय (बापू) टोळे, सरस्वती खैरमोडे, संगीता चव्हाण, अनिता देवकांत, रश्‍मी राऊत यांची नावे चर्चेत आली आहेत.
 
पुढील सव्वा वर्षासाठी आपली निवड व्हावी यासाठी काही जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले आहेत. आगामी काळात पुन्हा एकदा पाटण-रामपूर हा जूना पॅटर्ननूसार निवडी होतील असा अंदाज बांधला जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून जाहीर केलेल्यानूसार येत्या सोमवारी (ता.23) नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करायचे आहेत. त्याच दिवशई छाननी होईल. त्यानंतर अर्ज मागे घेण्याची मुदत 26 नोव्हेंबरपर्यंत आहे. आवश्‍यकता भासल्यास 27 नोव्हेंबरला निवडणूक होईल. त्यानंतर उपाध्यक्षपदाची निवड केली जाईल.

'महाविकास'ची काेणावरही दडपशाही नाही; 'हैदोस'चा अर्थ चंद्रकांतदादांनीच स्पष्ट करावा : बाळासाहेब पाटील

असे आहे पाटण नगरपंचायतीचे बलाबल

राष्ट्रवादी कॉंग्रेस 14

शिवसेना 02

भारतीय जनता पक्ष 02


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Patna Municipal Council Mayor Election Program Decleared Satara News