भूस्खलनबाधितांचे होणार कायमस्वरुपी पुनर्वसन; शंभूराज देसाईंच्या मागणीला मुख्यमंत्र्यांची मंजुरी

जुलै 2021 मध्ये मोठया प्रमाणांत झालेल्या ढगफुटीसदृश्य अतिवृष्टीमध्ये पाटण तालुक्यात मोठ्या प्रमाणांत भूस्खलन होऊन जिवीत व वित्त झाली.
Chief Minister
Chief MinisterSakal
Summary

जुलै 2021 मध्ये मोठया प्रमाणांत झालेल्या ढगफुटीसदृश्य अतिवृष्टीमध्ये पाटण तालुक्यात मोठ्या प्रमाणांत भूस्खलन होऊन जिवीत व वित्त झाली.

कऱ्हाड - पाटण तालुक्यातील भूस्खलनामुळे धोकादायक स्थितीतमध्ये असलेल्या सात गावांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पाठपुराव्यामुळे निधी मंजुर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे आंबेघर खालचे,अंबेघर वरचे, ढोकावळे, मिरगाव, हुंबरळी,शिद्रुकवाडी, जितकरवाडी (जिंती) या सात गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

जुलै 2021 मध्ये मोठया प्रमाणांत झालेल्या ढगफुटीसदृश्य अतिवृष्टीमध्ये पाटण तालुक्यात मोठ्या प्रमाणांत भूस्खलन होऊन जिवीत व वित्त झाली. त्यामुळे भुस्खलन होत असलेल्या धोकादायक गावांचे तात्पुरते स्थलांतर सुरक्षित ठिकाणी करण्यात आले होते. या धोकादायक गावांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करणे गरजेचे असल्याने सदर गावांचा कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा जागा मागणी व घर बांधणीचा प्रस्ताव शासनस्तरावर प्रलंबित होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या प्रलंबित प्रस्तावासंदर्भात उच्चस्तरीय बैठक घेण्यासंदर्भात मंत्री देसाई यांनी विनंती केली होती. त्यानुसार 05 ऑगस्टला मंत्रालयात मुख्यमंत्री शिंदे यांचे अध्यक्षतेखाली व मंत्री देसाई यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

मुख्यमंत्री यांनी या गावांचे पुनर्वसनासाठी आवश्यक असलेल्या खाजगी जमिन खरेदी प्रस्तावास लागणारा निधी तात्काळ देण्याचे निर्देश दिले. त्यानुसार संभाव्य अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यातील आंबेघर खालचे,अंबेघर वरचे, ढोकावळे, मिरगाव, हुंबरळी,शिद्रुकवाडी, जितकरवाडी (जिंती) या सात भूस्खलन बाधित गावांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या ठरावासह प्रस्तावीत केले होते. त्यासाठी तीन कोटी 88 लक्ष 60 हजारांचा निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांनी शासनास सादर केला होता. त्यास मुख्यमंत्री शिंदे यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे पुनर्वसनांतर्गत बाधित कुटुंबांना 588 घरे बांधून देणे व तेथीलले आऊट विकास कामे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी करण्याचा निर्णय झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com