esakal | फलटणला करावर सावकारी व्याजापेक्षा जादा दंड; जाधवांचा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

Satara

फलटणला करावर सावकारी व्याजापेक्षा जादा दंड; जाधवांचा आरोप

sakal_logo
By
किरण बोळे

फलटण शहर : कोरोनाच्या (Corona) भीषण परिस्थितीत नागरिकांची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कळित झाली आहे. नागरिकांसमोर जगण्याचा बिकट प्रश्न असताना फलटण पालिका प्रशासन (Goverment) मात्र महसूल कर (Tax) माफ करण्याऐवजी या करावर भरमसाट दंड आकारत आहे. या दंडाची तुलना केली असता तो बँका (Bank) किंवा खासगी सावकारांच्या व्याजापेक्षाही जास्त दंड आकारला जात असल्याचा आरोप फलटण पालिकेतील गटनेते नगरसेवक अशोकराव जाधव (Ashok Jadhav) यांनी केला असून, हा दंड माफ करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा: डॉ.दाभोलकर हत्या प्रकरण, पाच आरोपींवर मंगळवारी आरोप निश्चिती

मलठण येथील कांचनकन्होजा खरात व नगरसेवक श्री. जाधव, नगरसेवक सचिन अहिवळे यांनी पालिकेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना याबाबत निवेदन दिले. त्यात कोरोना काळातील सर्व कर व त्यावरील सर्व दंड माफ करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या वेळी गायकवाड यांच्याशी बोलताना महिला सबलीकरण अंतर्गत महिलांच्या नावावर असणाऱ्या सर्व मिळकतींवर ५० टक्के महसूल शुल्कमाफी द्यावी, अशी मागणी कांचनकन्होजा खरात यांनी केली आहे. नगरसेवक श्री. जाधव यांनी या पद्धतीची कर माफी इतर काही पालिकांमध्ये केली असल्याचे निदर्शनास आणून दिले. या पूर्वीही पालिका प्रशासनाकडे अशी मागणी केली होती; परंतु यावर कोणताही सकारात्मक निर्णय पालिका प्रशासन घेऊ शकले नाही.

हेही वाचा: ATM मुळे कोरोना वाढण्याचा धोका

कोरोना काळात जनसामान्यांचे जगणे हलाखीचे झाले असताना महसूल करावर सावकारी दंड आकारून नागरिकांवर अन्याय केला जात आहे. त्यामुळे कोरोना काळातील संपूर्ण कर व त्यावरील दंड माफ करावा, अशी मागणी कांचनकन्होजा खरात यांनी केली.

loading image
go to top