स्थानिक गुन्हे शाखेची सांगवीत माेठी कारवाई; गावठी पिस्तुलासह पाच जिवंत काडतूस हस्तगत

किरण बाेळे
Wednesday, 5 August 2020

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक आनंदसिंग साबळे, पोलिस हवालदार विनोद गायकवाड, सुधीर बनकर, पोलिस नाईक मोहन नाचन, संतोष जाधव, गणेश कापरे, पोलिस हवलदार वैभव सावंत, मोहसीन मोमीन, गणेश कचरे यांनी सहभाग घेऊन केली.
 

फलटण शहर (जि.सातारा) ः गावठी बनावटीचे पिस्तूल विक्रीसाठी सांगवी (ता. फलटण) येथे आलेल्या परप्रांतीयास ताब्यात घेण्यात आले आहे. या संशयिताकडून एक बिगरपरवाना गावठी बनावटीचे पिस्तूल व पाच जिवंत काडतूस असा सुमारे 82 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. बद्री सखाराम बिलालेपावरी (वय 35, मध्य प्रदेश) असे संशयिताचे नाव आहे.
 'त्या' प्रसिद्ध हॉटेलच्या मालकांसह चौघांवर गुन्हा 
 
एक गावठी बनावटीचे पिस्तूल विक्रीसाठी बारामती- फलटण रस्त्यावरील सांगवी येथे येणार आहे, अशी माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील, सहायक पोलिस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री अकराच्या सुमारास सांगवी येथे रस्त्यावर एक जण संशयितरीत्या फिरताना मिळून आला. त्यास थांबण्याचा इशारा केला असता, त्याने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न त्याने केला. पोलिस पथकाने त्यास शिताफीने ताब्यात घेतले.

लग्नानंतर देवाचा गोंधळ पडला महागात!, पेठ किन्हईत झाला कोरोनाचा शिरकाव

त्याच्याकडे चौकशी करून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे बिगरपरवाना एक गावठी बनावटीचे पिस्तूल व पाच जिवंत काडतूस असा सुमारे 82 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने ते गावठी बनावटीचे पिस्तूल विक्रीकरिता आणल्याचे सांगितले. बद्री सखाराम बिलालेपावरी (वय 35, रा. सिंगूर, ता. गोगावा, जि. खरगोन, मध्य प्रदेश) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध फलटण ग्रामीण पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंद केला आहे. पुढील कारवाईकरिता फलटण ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

पांडवकालीन मेरुलिंग; मंदिराच्या गाभाऱ्यात उमटताे तुमचा प्रतिध्वनी
 
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक आनंदसिंग साबळे, पोलिस हवालदार विनोद गायकवाड, सुधीर बनकर, पोलिस नाईक मोहन नाचन, संतोष जाधव, गणेश कापरे, पोलिस हवलदार वैभव सावंत, मोहसीन मोमीन, गणेश कचरे यांनी सहभाग घेऊन केली.

संपादन - संजय शिंदे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Phaltan Local Crime Branch Arrested Madhya Pradesh Citizen Along With Cartridges And Pistol