डेपोतील कचऱ्याच्या जागी फुलले 'मियावाकी'; साताऱ्यात 4000 झाडांचे यशस्‍वी संगोपन, काय आहे झाडाची खासियत?

खासगी संस्‍थेच्‍या मदतीने येथे मियावाकी पद्धतीने गेल्या वर्षी झाडांची (Miyawaki Tree) लागवड केली आहे.
Plantation Miyawaki Trees in Satara
Plantation Miyawaki Trees in Sataraesakal
Summary

आगामी काळात येथे पर्यावरणीय संतुलनासाठी इतरही उपक्रम पालिकेच्‍या मदतीने राबविण्‍यात येणार आहेत.

सातारा : शहरासह परिसरातील कचऱ्याचे संकलन केल्‍यानंतर त्‍यावर सोनगाव येथील पालिकेच्‍या (Satara Municipality) कचरा डेपोत प्रक्रिया करण्‍यात येते. या प्रक्रियेदरम्‍यान विलगीकरणानंतर कचऱ्याची साठवणूक परिसरातील मोकळ्या जागेत करण्‍यात येते. या जागेसह परिसरातील पर्यावरणीय साखळी अखंडित राहावी, यासाठी खासगी संस्‍थेच्‍या मदतीने येथे मियावाकी पद्धतीने गेल्या वर्षी झाडांची (Miyawaki Tree) लागवड केली आहे. सुमारे चार हजार झाडांचे येथे यशस्‍वी संगोपन, संवर्धन, जतन झाल्‍याने येथील प्रदूषणाची पातळी कमी होण्‍यास मदत झाली आहे.

प्रक्रियेतील पाणी झाडांना

सोनगाव येथील कचरा डेपो सुमारे १८ एकर जागेत विस्‍तारला आहे. याठिकाणी कचरा विलगीकरणासह इतर प्रक्रिया, तसेच मैला व्‍यवस्‍थापन प्रकल्‍प देखील आहे. या प्रकल्‍पाची प्रक्रिया क्षमता ५० हजार लिटर इतकी आहे. या प्रक्रियेदरम्‍यान बाहेर येणारे पाणी मियावाकी पद्धतीने लावलेल्‍या झाडांना देण्‍यात येत आहे. याचबरोबरच या प्रकल्‍पातून निघणाऱ्या स्‍लरीच्‍या मदतीने येथे खतनिर्मिती देखील करण्‍यात येत आहे.

Plantation Miyawaki Trees in Satara
Sugarcane Fire : 18 महिने पोटच्या पोराप्रमाणं सांभाळलेला ऊस स्वतःच्या हातानं पेटवून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ

काय बदल होतोय...

येथील परिसरातील जागेची निश्चिती करत मियावाकी पद्धतीने चार हजार झाडांची लागण करण्‍यात आली. या झाडांचे यशस्‍वी संगोपन, जतन झाल्‍याने त्‍यांची वाढ झपाट्याने होत आहे. या झाडांमुळे येथील जैवविविधता साखळी विकसित होण्‍याबरोबरच परिसरातील प्रदूषण कमी होण्‍यास मदत झाली आहे. आगामी काळात येथे पर्यावरणीय संतुलनासाठी इतरही उपक्रम पालिकेच्‍या मदतीने राबविण्‍यात येणार आहेत.

Plantation Miyawaki Trees in Satara
Pearl Farming : आता शिवाजी विद्यापीठात पिकणार 'मोती'; प्राणीशास्त्र अधिविभागानं घेतला पुढाकार

अशी आहे स्थिती...

  1. एकूण लावलेली झाडे : चार हजार

  2. झाडांचे वर्गीकरण : फळे, औषधी वनस्‍पती

  3. पद्धती : दीड फूट अंतरात एका आड एक

  4. संगोपन : सद्यःस्‍थितीत झाडांची उंची दहा फूट

  5. व्‍याप्‍ती : सुमारे २० गुंठ्यांत.

Plantation Miyawaki Trees in Satara
Dam Water Storage : पाणी तुटवड्याचं संकट! काळम्मावाडी, राधानगरी, तुळशी धरणात किती आहे साठा?

काय होत होते

कचरा डेपोतील कचऱ्यावर प्रक्रिया केल्‍यानंतर मानवी, तसेच पर्यावरणास हानी पोचवणाऱ्या घटकांचे विलगीकरण करण्‍यात येते. काही कारणास्‍तव येथील कचऱ्यास आग लागल्‍यामुळे तसेच इतर कारणांमुळे येथील प्रदूषणाची पातळी वाढून त्‍याचा त्रास परिसरातील नागरिकांना, तसेच लगतच्‍या गावांतील ग्रामस्‍थांना होत असे. हा त्रास कमी करण्‍यासाठीच्‍या उपाययोजना पालिका राबवत असे. मात्र, त्‍यामुळे पर्यावरणीय परिस्‍थितीत जास्‍तीचा बदल होत नव्‍हता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com