esakal | जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलणाऱ्या व्यावसायिकांविरोधात 'पंचायत' आक्रमक

बोलून बातमी शोधा

Traders
जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलणाऱ्या व्यावसायिकांविरोधात 'पंचायत' आक्रमक
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उंब्रज : येथील ग्रामपंचायत प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 14 व्यावसायिकांच्यावर दंडात्मक कारवाई करून सुमारे 14 हजार रुपयांचा दंड वसूल केला. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जास्तीत जास्त व्यावसायिकांनी आरटीपीसीआर तपासणी करून घ्यावी, असे आवाहन सरपंच युवराज जाधव यांनी केले आहे.

यासाठी येथील ग्रामपंचायतीने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून भाजी मंडई बंद करून त्याचे माणिक चौक, यशवंत हायस्कूल, आदर्श शाळा व तक्षशिलानगर असे चार ठिकाणी विभाजन केले आहे. उंब्रज येथील नागरिकांनी आपापल्या विभागातच भाजी खरेदी करावी, असे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे. उंब्रज ग्रामपंचायतीचे सरपंच युवराज जाधव, उपसरपंच सुनंदा जाधव, ग्रामविकास अधिकारी व्ही. एम. चव्हाण, मंडलाधिकारी युवराज काटे, तलाठी संदीप काळे आदींनी भाजी मंडई तसेच अत्यावश्‍यक साहित्य खरेदीसाठी गर्दी होणार नाही, यादृष्टीने व्यावसायिकांना सूचना करून आरटीपीसीआर तपासणी करण्याचे आवाहन करण्याबरोबरच तपासणी न करणाऱ्या व्यापाऱ्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. संपूर्ण गावात फॉगिंग मशिनद्वारे फवारणी करण्यास सुरुवात केली आहे.

तांबवेतील नंदकिशोरचा राजधानीत झेंडा; दिल्लीत पहिल्याच प्रयत्नात 'यश'

Edited By : Balkrishna Madhale