जनावरांची बेकायदा वाहतूक आणि कत्तल करणारी तिघांची टोळी जिल्ह्यातून तडीपार; 'इतक्या' वर्षांसाठी कारवाई

या टोळीवर जिल्ह्यामध्ये जनावरांची बेकायदा वाहतूक व मांस विक्रीचे गुन्हे सातत्याने दाखल होत होते.
illegal Transportation Animals Case
illegal Transportation Animals Caseesakal
Summary

फलटण पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील शेळके यांनी त्यांना तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे पाठविला होता.

फलटण : जनावरांची (Animals) बेकायदा वाहतूक व कत्तल करणाऱ्या फलटण (Phaltan) तालुक्यातील तिघांच्या टोळीला पोलिस अधीक्षक समीर शेख (Superintendent of Police Sameer Sheikh) यांनी दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार केले आहे. मुबारक हनिफ कुरेशी (वय ३३), शाहरूख जलील कुरेशी (वय ३०) व अजिम शब्बीर कुरेशी (वय ३४, रा. सर्व कुरेशीनगर, मंगळवार पेठ, फलटण) अशी त्यांची नावे आहेत.

या टोळीवर जिल्ह्यामध्ये जनावरांची बेकायदा वाहतूक व मांस विक्रीचे गुन्हे सातत्याने दाखल होत होते. वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नव्हती. त्यामुळे फलटण पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील शेळके यांनी त्यांना तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे पाठविला होता.

illegal Transportation Animals Case
खासदार उदयनराजेंनी घेतली काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्‍यक्षांची भेट; राजकीय चर्चांना उधाण, भेटीत काय घडलं?

यावर सुनावणी घेऊन अधीक्षकांनी त्यांना सातारा जिल्हा, तसेच सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका, पुणे जिल्ह्यातील बारामती व पुरंदर या तालुक्यातून दोन वर्षे तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत. नोव्हेंबर २०११ पासून १५ उपद्रवी टोळ्यातील ४९ जणांना पोलिस अधीक्षकांनी तडीपार केले आहे.

illegal Transportation Animals Case
Loksabha Election : '2009 च्या निवडणुकीत झालेली जखम मी अजून विसरलेलो नाही'; संभाजीराजेंचं कोणाला उद्देशून वक्तव्य?

या कारवाईत अतिरिक्त पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक अरुण देवकर, हवालदार प्रमोद सावंत, केतन शिंदे, अनुराधा सणस, फलटण पोलिस ठाण्याचे हवालदार अशोक वाडकर यांनी योग्य पुरावा सादर केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com