गोळेश्‍वरात 384 दारूच्या बाटल्या जप्त; वाळव्याच्या एकाला अटक

Liquor
Liquoresakal

कऱ्हाड (सातारा) : कोरोनाच्या लागलेल्या संचारबंदीत दारूविक्री (Liquor Selling) व वाहतुकीस बंदी आहे, तरीही होणारी अवैध दारू वाहतूक येथील उत्पादन शुल्क विभागाने (Excise Department) आज रोखली. 23 हजारांच्या 384 देशी दारूच्या बाटल्यांसह एक चारचाकी वाहनही छाप्यात जप्त केले आहे. तालुक्‍यातील गोळेश्वर येथे दुपारी कारवाई झाली. शंकर उत्तम सुर्वे (रा. नरसिंगपूर, ता. वाळवा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. (Police Arrest One People In Goleshwar For Selling Illegal Liquor Case Satara Crime News)

Summary

बंदी असतानाही गोळेश्वर परिसरात अवैध दारूविक्री होत असल्याची माहिती उत्पादन शुल्कला मिळाली. त्यानुसार पथकाने गोळेश्वर येथे सापळा रचला.

बंदी असतानाही गोळेश्वर परिसरात अवैध दारूविक्री होत असल्याची माहिती उत्पादन शुल्कला मिळाली. त्यानुसार उत्पादन शुल्कच्या पथकाने आज दुपारी गोळेश्वर येथे सापळा रचला. त्या वेळी सुर्वे त्याच्याकडील जीप (एसएच 13 एएसी 1745) घेऊन त्या भागात आला. उत्पादन शुल्कला मिलालेल्या माहितीनुसार, त्यांनी ते वाहन अडविले. त्या वेळी वाहनाची तपासणी केली.

Liquor
'आमचा सचिन सुखरूप येईल असे वाटत हाेते'; गावकरी शाेकसागरात

वाहनांत देशी दारूच्या 23 हजारांच्या 384 बाटल्या सापडल्या आहेत. कारवाईत मोठ्या वाहनांसह उत्पादन शुल्कने 23 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कारवाईत उत्पादन शुल्कचे निरीक्षक राजेंद्रकुमार पाटील, उपनिरीक्षक राजू खंडागळे, सहायक दुय्यम निरीक्षक सचिन बावकर, जवान विनोद बनसोडे व महिला जवान राणी काळोखे यांनी सहभाग घेतला.

Police Arrest One People In Goleshwar For Selling Illegal Liquor Case Satara Crime News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com