युवकाच्या खूनप्रकरणी भुईंजच्या चौघांना अटक; दोघे फरारी

गिरीश चव्हाण
Sunday, 10 January 2021

अटकेतील संशयितांनी खून केल्यानंतर ओमकारचा मृतदेह जाळल्याचे, तसेच त्यापूर्वी त्याच्याकडील सोन्याची अंगठी आणि मोबाईल काढून घेतल्याची माहिती अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांनी दिली.

सातारा : आसले (ता. वाई) येथील ओमकार कैलास चव्हाण (वय 30) याचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चार जणांना अटक केली आहे. रोहन राजेंद्र जाधव (वय 19), रोहित संजय घाडगे (वय 20), समाधान ऊर्फ चंप्या राजेंद्र शिंदे (वय 19), सलीम ख्वाजासाहेब शेख (वय 19, सर्व रा. भुईंज) अशी त्यांची नावे आहेत. या गुन्ह्यातील अनिरुद्ध ऊर्फ बंटी जाधव (रा. भुईंज) आणि बंटी मोरे हे फरारी असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. या खुनामागील कारणांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

आसले येथील ओमकार चव्हाण हा ता. 4 रोजी पाचवड येथे जाऊन येतो, असे सांगून घरातून निघून गेला होता. घरातून निघून गेलेला ओमकार घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार भुईंज पोलिस ठाण्यात नोंदवली. शोधादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला भुईंजमधील काही जणांनी ओमकारचे अपहरण करून खून केल्याची माहिती मिळाली. यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किशोर धुमाळ यांनी सहायक निरीक्षक रमेश गर्जे यांना तपासाच्या सूचना दिल्या. गर्जे यांनी सहायक फौजदार रमेश गर्जे, उत्तम दबडे, हवालदार अतिश घाडगे, मुनीर मुल्ला, रवी वाघमारे, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, गणेश कापरे, विशाल पवार, विक्रम पिसाळ, रोहित निकम, सचिन ससाणे, वैभव सावंत, संकेत निकम, केतन शिंदे, संजय जाधव, गणेश कचरे यांनी तपास सुरू केला.

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांत रंगली अर्धा तास चर्चा; माजी मुख्यमंत्र्यांचे स्मितहास्य गुलदस्त्यात 

Facebook वरील मैत्री महागात; लग्नाच्या आमिषाने सातारच्या महिलेला लाखोंना गंडा; नाशिकातील एकावर गुन्हा

तपास करत या पथकाने रोहन जाधव, रोहित घाडगे, समाधान शिंदे, सलीम शेख यांना ताब्यात घेतले. त्यांचे दोन साथीदार फरारी असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे. अटकेतील संशयितांनी खून केल्यानंतर ओमकारचा मृतदेह जाळल्याचे, तसेच त्यापूर्वी त्याच्याकडील सोन्याची अंगठी आणि मोबाईल काढून घेतल्याची माहिती अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

भाविकांनाे! पुसेगावात तीन दिवस जमावबंदी, संचारबंदी लागू 

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Arrested Four Youth From Bhuinj Satara Crime News