विहिरीतील मोटारी चोरणारी टोळी गजाआड; खंडाळा पोलिसांची धडक कारवाई

खंडाळा पोलिस ठाणे हद्दीतील विहिरीतील मोटारी व मोटारसायकल चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात आली.
Gang Of Motorcycle
Gang Of Motorcycleesakal

खंडाळा (सातारा) : खंडाळा पोलिस ठाणे हद्दीतील विहिरीतील मोटारी व मोटारसायकल चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात खंडाळा पोलिस ठाण्याला यश आले असून, सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या टोळीकडून सात गुन्हे उघडीस आणण्यास पोलिसांना यश आले आहे.

खंडाळा पोलिस ठाणे हद्दीतील विहिरीतील मोटर व मोटारसायकल चोरीच्या घटना घडत असल्याने पोलिस निरीक्षक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस सचिन वीर, प्रशांत धुमाळ, तुषार कुंभार, बालाजी वडगावे यांचे पथक तयार करण्यात आले होते. या पथकाला मिळालेल्या बातमीवरून पोलिस ठाणे हद्दीतील विहिरीतील मोटर व मोटरसायकल चोरी करणारी टोळी पकडण्यात पोलिसांना यश आले.

या टोळीकडून सात मोटरसायकली व विहिरीतील मोटर असे मिळून तीन लाख 34 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या टोळीकडून चोरीचे सात गुन्हे उघड झाले असून, खंडाळा पोलिस ठाणे हद्दीतील तीन, लोणंद पोलिस हद्दीत हद्दीतील एकूण चार व सासवड पोलिस ठाणे हद्दीत एक यांचा त्यामध्ये समावेश आहे. सर्व गुन्हे मोटारसायकल व मोटर चोरीचे असल्याचे सांगण्यात आले.

Edited By : Balkrishna Madhale

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com