

Shinde Family Being Deliberately Targeted, Claims Prakash Shinde
sakal
सातारा: सावरी (ता. जावळी) येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणाबाबत काँग्रेस व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून माझ्यावर करण्यात आलेले आरोप हे बिनबुडाचे व निराधार आहेत. त्या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. केवळ शिंदे कुटुंबाला टार्गेट करण्यासाठी विरोधकांकडून प्रयत्न केला जात आहे, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू माजी नगरसेवक प्रकाश शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.