

Anil Sawant joins BJP in Wai in the presence of Shivendrasinhraje Bhosale.
Sakal
वाई : सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि भाजपचे प्रांतिक सदस्य माजी आमदार मदन भोसले, जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा डॉ. सुरभी भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे माजी नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह आज भाजपमध्ये प्रवेश करून ‘कमळ’ हातात घेतले.