
कोरेगाव: लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याची तक्रार एका महिला डॉक्टरने दिल्याने पोलिसांनी एका डॉक्टरवर गुन्हा दाखल केला आहे. डॉ. गणेश हरिभाऊ होळ (रा. सुभाषनगर, कोरेगाव) असे संशयिताचे नाव आहे. तो सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या डॉक्टर सेलचा विद्यमान अध्यक्ष आहे. कोरेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडलेला आहे.