esakal | दबावाचं राजकारण कराल, तर उलथून टाकू; आमदार शिंदेंचा भाजपच्या शिवेंद्रराजेंना इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

Shashikant Shinde

हुकूमशाहीच्‍या जिवावर अनेकांना ‘मी पुन्‍हा येईन’ची स्‍वप्‍ने पडत होती.

दबावाचं राजकारण कराल, तर उलथून टाकू

sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : हुकूमशाहीच्‍या जिवावर अनेकांना ‘मी पुन्‍हा येईन’ची स्‍वप्‍ने पडत होती. त्‍यांची ही स्‍वप्‍ने राष्‍ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार (MP Sharad Pawar) यांनी धुळीस मिळवत महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) निर्मिती केली. या आघाडीच्‍या माध्‍यमातून सर्वसामान्‍यांची कामे मार्गी लावण्‍यात येत आहेत. दबाव टाकून कोणी राजकारण केल्‍यास उलथून टाकू, असा इशारा आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) यांनी परळी येथील मेळाव्‍यादरम्‍यान नाव न घेता आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinharaje Bhosale) यांना दिला.

परळी भागातील शशिकांत वाईकर यांनी समर्थकांसह श्री. शिंदे, जिल्‍हा परिषद सदस्‍य दीपक पवार (Zilla Parishad Member Deepak Pawar) यांच्‍या उपस्‍थितीत राष्‍ट्रवादीत प्रवेश केला. त्याप्रसंगी ते बोलत होते. श्री. शिंदे म्‍हणाले, ‘‘सातारा हा राष्‍ट्रवादीची पाठराखण करणारा जिल्‍हा आहे. राष्‍ट्रवादीच्‍या स्‍थापनेपासून जिल्‍हावासीयांनी शरद पवार यांच्‍यावर मनापासून प्रेम केले आहे. राष्‍ट्रवादी म्‍हणजे विश्‍‍वास असून तो विश्‍‍वास नेहमीच जपण्‍याचा प्रयत्‍न सर्वांनी केला आहे. परळी, पाटण, जावळी या तालुक्‍यांतील जनतेचे मुंबईच्‍या विकासात मोठे योगदान आहे. मी मुंबईत नेहमी परळी भागातील लोकांना भेटत त्‍यांची कामे मार्गी लावतो.

हेही वाचा: निवडणुकीत राष्ट्रवादीची भूमिका ठरणार 'निर्णायक'

महविकास आघाडीमुळे अनेकांची स्‍वप्‍ने धुळीस मिळाली आहेत. दोन दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी स्‍वबळावर लढून आम्‍ही जिल्‍हा काबीज करू, असे वक्तव्य केले आहे. ते काय बरळतात, त्‍यांनाच माहिती. तेवढे ते सोपे नाही. कारण तुमच्‍यासमोर राष्‍ट्रवादीचे सैन्‍य आहे. परळी भागातील जनतेची कामे मार्गी लावण्‍याची जबाबदारी माझी, दीपक पवार, शशिकांत वाईकर यांची आहे. कोणतेही काम घेऊन या, कामे मार्गी लागतील. प्रत्‍येक ग्रामपंचायत आपल्‍याला आपल्‍या विचारांची करायची आहे. अनेक निवडणुका पुढे आहेत. प्रत्‍येक निवडणुकीत आपल्‍याला परळी खोऱ्यात राष्‍ट्रवादीचा झेंडा फडकवायचा आहे. त्‍यासाठी लागेल ती ताकद मी देण्‍यास तयार आहे.’’ पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडत परळी खोऱ्यात राष्‍ट्रवादीचे वादळ उभे करण्‍याचे आश्‍‍वासन श्री. वाईकर यांनी उपस्‍थितांना दिले.

हेही वाचा: शिवेंद्रराजेंच्या कट्टर समर्थकाचा 200 कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश

घरात ५० वर्षे सत्ता असतानाही परळीचा विकास त्‍यांना करता आलेला नाही. यासाठी सत्ताबदल आवश्‍‍यक असून त्‍यासाठी परळीतील जनतेने शशिकांत वाईकर यांच्‍याप्रमाणे राष्‍ट्रवादीच्‍या प्रवाहात सामील होण्‍याची गरज आहे.

-दीपक पवार, जिल्हा परिषद सदस्य

loading image
go to top